आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

​पश्चिम बंगालच्या तरुणाचा खून; मृतदेह हॉटेल परिसरात पुरला; ठाण्यातील घटना

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ठाणे- एका २८ वर्षीय तरुणाचा खून करून मृतदेह ठाण्यातील कापूरबावडी येथील हॉटेल परिसरात पुरल्याची घटना उघडकीस आली. तपस चंदा असे मृताचे नाव असून तो पश्चिम बंगाल येथील रहिवासी आहे. तपस हा कापूरबावडी येथील एका हॉटेलमध्ये काम करत होता. मात्र, तीन महिन्यांपूर्वी त्याने नोकरी साेडली होती. गेल्या काही महिन्यांपासून तो बेपत्ता होता. त्यामुळे त्याच्या कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी संबंधित हॉटेलच्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता एक जण तपसचा मृतदेह हॉटेल परिसरात पुरताना निदर्शनास आले. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, तपस याचा कुणाही वाद होता का? याचाही पोलिस तपास करत आहेत. 

बातम्या आणखी आहेत...