International Special / ख्रिस गेलने शेअर केला विजय मल्ल्यासोबत फोटो, कॅप्शनमध्ये लिहीले-'बिग बॉसला भेटून चांगलं वाटल...', युझर्सनी केले ट्रोल

युझर्स म्हणाले- 'घरी जाताना तुझे पैसे, लॉकेट जागेवर अहेत का ते चेक कर...'

दिव्य मराठी वेब

Jul 14,2019 03:37:12 PM IST

इंटरनॅशनल डेस्क- भारतीय बँकांना हजारो कोटींचा डल्ला मारून परदेशात पळून गेलेल्या विजय मल्ल्यासोबत वेस्ट इंडिजचा फलंदाज ख्रिस गेलने फोटो शेअर केला आहे. यानंतर सोशल मीडिया युझर्सनी ख्रिस गेलला चांगलंच फैलावर घेतले. फोटोमध्ये गेलने मल्ल्याला बिग बॉस असा उल्लेख केल्यामुळे तो ट्रोल झाला आहे.


फॉर्म्यूला-1 ब्रिटिश ग्रॅण्ड प्रिक्स 2019 ला आजपासून सुरुवात होत आहे. यावेळी ख्रिस गेल आणि विजय मल्ल्याची भेट झाली. यावेळचा एक फोटो गेलने आपल्या ट्विटर अकाउंटव शेअर केला आहे. 'बिग बॉस विजय मल्ल्याला भेटून खूप चांगलं वाटलं. रॉकस्टार…' असे कॅप्शनही गेलने या फोटोला दिले.


या पोस्टनंतर अनेक युझर्सनी त्याला चांगलेच ट्रोल केले. विजय मल्ल्याला बॉस म्हणणाऱ्या गेलला लाज वाटली पाहिजे, असे एका युजर्सने म्हटले आहे. मल्ल्याला तुझ्या बँक अकाऊंटची माहिती देऊ नको असे काही जणांना म्हटले आहे. काहींनी तर त्याला कर्ज देऊ नका असेही सांगितले आहे. तर काहींनी त्याला सांग आमचे पैसे परत कर अशीही मागणी केली आहे.

X
COMMENT