आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ओले केस न पुसता खुल्या हवेत गेल्यास सर्दी हाेत नाही 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सामान्यपणे असे मानले जाते की, जर केस आेले असतील तेव्हा माेकळ्या जागेत किंवा हवेत जाऊ नये, कारण त्यामुळे व्यक्ती आजारी पडू शकते. असेही म्हटले जाते की, केस आेले ठेवून थंड हवेत फिरावयास गेल्यास सर्दी-खाेकला हाेऊ शकताे. परंतु हे तितकेसे खरे नाही. मात्र, वस्तुस्थिती अशी आहे की, भलेही केस आेले असतील तरीही जाेपर्यंत तुमच्यावर सर्दीशी संबंधित विषाणू हल्ला करत नाहीत ताेपर्यंत तुम्ही आजारी पडू शकत नाहीत. 


मुंबईच्या जसलाेक रुग्णालयातील डर्मेटाेलाॅजिस्ट तथा ट्रायकोलॉजिस्ट डॉ. दीप्ती घिया म्हणतात की, साधारण सर्दी ही विषाणूंमुळे हाेते. जर तुम्ही केवळ रायनाे विषाणूंच्या संपर्कात आला असाल (जे सामान्य सर्दीचे कारक असतात) तर सर्दी हाेऊ शकते. रायनाे विषाणू हा कमी तापमानात उद्दीपित हाेताे. परंतु आेल्या केसांमुळे सर्दी हाेते ही कल्पना निरर्थक आहे. याचप्रमाणे गारव्यात हायपाेथर्मिया हाेण्याची शक्यता असते. ज्यामुळे आपली राेगप्रतिकारक शक्ती कमी हाेते. मात्र, जर राेगप्रतिकारक शक्ती ठक असेल तर आजारी पडण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. 


ताप आल्यानंतर आम्ही अॅस्पिरिन आणि पॅरासिटामाॅलसारखी आैषधे घेताे. त्यामुळे ताप बऱ्यापैकी कमी हाेताे, परंतु सर्दी-खाेकल्याचे विषाणू वेगाने प्रसार पावतात. जर शरीराचे तापमान कमी राहिले आणि हे विषाणू अवतीभवती असतील तर त्याचा प्रभाव तुमच्यावर पडणे साहजिकच आहे. तुमच्या शेजारी जर सर्दी-खाेकला-ताप असलेली व्यक्ती असेल तरीही त्या विषाणूंच्या प्रभावामुळे तुम्ही आजारी पडू शकता. 

बातम्या आणखी आहेत...