आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • What About The Farmers In Budget ? 5% Increase In Agriculture Budget, Budget News And Updates

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गाव-गरीब, शेतकऱ्यांचे काय? गावांसाठी 16 सूत्री सोळा शृंगार, कृषीच्या बजेटमध्ये 5% वाढ

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • कृषीसाठी 1.42 लाख कोटींची तरतूद, 3 वर्षांत उत्पन्न दुप्पट होणार
  • 20 लाख शेतकरी ‘कुसुम’ च्या कक्षेत, सौर पंपासाठी मदत

नवी दिल्ली- शेतकऱ्यांसाठी अर्थसंकल्प गुलाबी हंगामासारखा आहे. २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा सरकारने पुनरुच्चार केला. मात्र ठोस मार्ग दाखवला नाही. १६ सूत्रे स्पष्ट केली आहेत. मागील वर्षी पीएम-किसान सन्मान निधीद्वारे छोट्या शेतकऱ्यांना वर्षाकाठी ६००० रुपये देण्याची तरतूद होती. यावेळी, नाशवंत भाजीपाला-फळांच्या वाहतुकीसाठी किसान रेल्वे आणि कृषी उडान योजना सादर होईल.  शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या कर्जाचे लक्ष्य वाढवून १५ लाख कोटी रुपये केले आहे.


पडिक जमिनीवर सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यास शेतकऱ्यांना परवानगी मिळेल. त्यातून निर्माण होणारी वीज ग्रीडला विकून शेतकऱ्यांना पैसे मिळवता येतील. प्रधानमंत्री शेतकरी ऊर्जा सुरक्षा व उन्नती महाअभियान (पीएम-कुसूम) योजनेची कक्षा रुंदावत २० लाख शेतकऱ्यांचा समावेश करणार. ग्रीडशी जोडलेले सौर पंप लावण्यास मदत देणार. पाण्याची टंचाई असलेल्या १०० जिल्ह्यांसाठी सरकारने एकत्रित उपायांची घोषणा केली आहे.

परिणाम... गाव व कृषीवर खर्च करणार 2.83 लाख कोटी

अर्थसंकल्पात गाव आणि शेतकऱ्यांवर भर आहे. शेती, सिंचन आणि संबंधित योजनांवर 1.60 लाख कोटी रुपये खर्च होतील. मागील अर्थसंकल्पापेक्षा हे 5% जास्त आहे. कृषितज्ज्ञ एम. एस. स्वामिनाथन यांच्या मते, अर्थसंकल्पात सरकारने शेती आणि शेतकऱ्याला प्राधान्य दिले आहे.

गावाची स्थिती

महिला पुन्हा बनणार ‘धान्यलक्ष्मी’
 
बचत गटांकडे साठवणुकीची व्यवस्था राहील, त्यामुळे लॉजिस्टिकचा खर्च कमी होईल. महिलांना धान्यलक्ष्मीचे स्थान देण्याचा प्रयत्न. फलोत्पादन क्षेत्रात एक उत्पादन एक जिल्हा योजनेवर लक्ष केंद्रित केले जाईल. त्यामुळ‌े विपणन आणि निर्यातीला प्रोत्साहन मिळेल.  

शेतकऱ्यांची कथा

दूध उत्पादन 108 लाख टनांवर नेणार  


पिकांचा हंगाम नसताना मधमाशी पालन, पशुपालन व इतर स्रोतांवर भर दिला जाईल. संतुलित खत वापराबाबत योजना सादर होईल. दुग्धोत्पादन वाढवून दुप्पट केले जाईल. दूध उत्पादन 53 वरुन 108 टनांवर नेण्याचा संकल्प आहे. जैविक शेतीसंबंधी पोर्टल आणखी सक्षम करणार.

गरिबांचा विकास
 

नव्या योजनेची घोषणा नाही


दीनदयाल अंत्योदय योजना- गरिबी हटावसाठी 58 लाख बचत गटांना 0.5 कोटी कुटुंबांशी जोडणार. 
मात्र, गरिबांसाठी वेगळ्या नव्या योजनेची कोणतीही घोषणा नाही. पशुधनांच्या आजारांवर उपायांसाठी मनरेगाचा वापर करणार