आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराहिंगोली- न्याय्य मागण्यांसाठी व कष्टकरी समाजासाठी काम करणाऱ्या कन्हैया कुमार, हार्दिक पटेल यांच्यासारख्या बहुजन समाजातील कार्यकर्त्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला. परंतु दिल्लीत प्रत्यक्ष राज्यघटना जाळून राज्यघटनेविरुद्ध आणि प्रचंड घोषणाबाजी करणाऱ्या पांडे नावाच्या व्यक्तीवर देशद्रोहाचा गुन्हा का दाखल करण्यात आला नाही, असा सवाल संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी केला.तसेच सरकार मनुवादी विचार करणारे असल्याने असले प्रकार होत असून यानंतर त्यामध्ये वाढ होणार आहे, असा आरोपही गायकवाड यांनी केला.
हिंगोली येथील महात्मा फुले शिक्षण परिषदेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या महात्मा फुले गौरव पुरस्कार वितरण समारोह घेण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्यासाठी प्रवीण गायकवाड येथे अाले होते. विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या मान्यवरांना महात्मा फुले गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आल्यानंतर येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्यावेळी ते म्हणाले की सध्याचे सरकार मराठा समाजाची एकही मागणी पूर्ण करू शकत नाही. या सरकारची मराठा समाजाची केवळ आश्वासनावर बोळवण करण्याची इच्छा असल्याने या सरकारकडून मराठा समाजाच्या हिताचा एखादा निर्णय होण्याची अपेक्षा करणे मूर्खपणाचे ठरेल.
ही तर फसवाफसवी
अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ मराठा समाजासाठी नसून ते खुल्या प्रवर्गासाठी आहे. या महामंडळाकडे पैसे नाहीत. तरीही मुख्यमंत्री या महामंडळाकडे बोट दाखवतात. हा फसवाफसवीचा प्रकार आहे, असेही गायकवाड म्हणाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.