युद्धाच्या वेळी शरीराची / युद्धाच्या वेळी शरीराची ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी काय खात होते आमचे सैनिक 

विष्णू मनोहर

Jan 26,2019 09:26:00 AM IST

दिव्य मराठी स्पेशल- सैनिक युद्धभूमीवर जातात तेव्हा ते घोड्याच्या पाठीमागे पाण्याची थैली बांधतात. बसण्याच्या जागी जी गादी ठेवलेली असते तिच्यात धान्य भरतात. दीर्घ काळ चालणारे युद्ध हे घरापासून दूरदेशी असल्याने आमचे वीर सैनिक शरीराची ऊर्जा, उत्साह टिकवून ठेवण्यासाठी भूक लागते. त्या वेळी मक्याची भाकर खातात.कारण यात स्टार्च, तंतूमय पदार्थ आणि लोह हे घटक अधिक असतात. देशी डाळीही खूप खातात. कारण यात प्रथिने असतात. पदार्थांमध्ये तेलाचे प्रमाण बरोबरीत असते. कारण त्या वेळी साखर फारशी उपलब्ध होत नसल्याने गुळ किंवा उसाच्या रसाचा घट्ट पाक वापरत. तसेच भाज्या जास्त शिजवत नसत. त्यामुळे त्यांची पौष्टिकता टिकून पंचनही उशिराने होते. त्यामुळे बराच वेळेपर्यंत भूक लागत नसे. याशिवाय शेंगदाणे, गुळ आणि लाडूदेखील सोबत ठेवत. मध्येच भूक लागली तर गुळ शेंगदाण्याचा लाडू खात, या देशी पदार्थांमुळे सैनिकांची ऊर्जा सतत टिकून राहण्यास मदत मिळत असे.

जाणून घ्या पाच खाद्यपदार्थांविषयी, ज्यांचा भारतीय सैनिकांनी आहारात समावेश केला आहे
पुरणपोळी

1. तांदूळ उकळल्यानंतर त्याला एकजीव करतात. गुळ टाकतात आणि लाट्या बनवून ठेवतात. गव्हाच्या पिठापासून चपाती बनवतात. त्यात तांदूळ आणि गुळाचे भरण भरवून बंद करतात. पोळी तयार झाल्यानंतर ती पराठ्यांप्रमाणे शेकून घेतात आणि खातात.

बदामाचे लाडू
2. यात फॅट नसतो, शरीराला भरपूर ऊर्जा मिळते आणि बुद्धीही तेज राहते. बदाम, गूळ एकत्र करून दगडावर ठेचतात. ते भाजून घेतल्याने तेल तिघते. यापासून गूळ, बदाम टाकलेले लाडूू बनवून घेतात. त्यालाच गुट्टा असेही म्हणतात.

कडबोळी
3. पीठ, उडदाची डाळ, हरभरा डाळ आणि तांदूळ वाटून उपलब्ध मसाले टाकतात. भाज्या टाकून मिश्रण बनवल्यानंतर ते उन्हात वाळवतात. नंतर ते बांगडीच्या आकारात दिसते. त्यामुळे सैनिकांनी त्याला कडा हे नाव ठेवले आहे. ते भाजीसोबत खातात.

अंबिल
4. तांदूळ उकळून त्यात मीठ टाकतात. नंतर ते मातीच्या भांड्यात ठेवतात. काही तासांनंतर चांगले मुरल्यानंतर ते खातात. सैनिक युद्धावर जाताना आपल्यासोबत नेतात. कारण ते फर्मेंटेड नशा आणते. सैनिक त्यास पसंती देतात.

सातूच्या बट्ट्या
5. गरम पाण्यात गूळ आणि सातूचे पीठ टाकून मळतात. बट्टीसाठी करमरीत पीठ दळून त्यात सातूचे भरवण करतात आणि लाट्या बनवून गोवऱ्यावर भाजून घेतात.

X
COMMENT