आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराहिंदू घरांमध्ये रोज देवी-देवतांची पूजा करण्याचे विधान आहे. पूजा-पाठ हे हिंदू धर्माचे अभिन्न अंग आहे. आपल्या दाहरम ग्रंथांमध्ये देवतांच्या पुजेशी संबंधित विविध गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. या गोष्टी अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत. आज आम्ही तुम्हाला पुजेशी संबंधित काही खास गोष्टी सांगत आहोत.
1. महादेवाच्या पूजेत कधीच केतकीच्या फूलांचा वापर करु नये. सूर्यदेवाच्या पूजेत कधीच अगस्त्यचे फूल चढवू नये. गणपतीच्या पूजेत तुळशी कधीच अर्पण करु नये.
2. सकाळी स्नान केल्यानंतर जो व्यक्ती देवतांसाठी स्वतः फुलं तोडून ते अर्पित करतो, देवगण त्या फुलांचा प्रसन्नतेने स्वीकार करतात. वायू पुराणानुसार जो व्यक्ती स्नान न करता तुळशीचे पान तोडून देवाला अर्पण करतो अशा पूजेचा देव स्वीकार करत नाहीत.
2. सूर्यदेव, श्रीगणेश, दुर्गा, शिव आणि विष्णुला पंचदेव म्हटले जाते. सुखाची इच्छा ठेवणा-या प्रत्येक मनुष्याला या पाच देवांची पुजा अवश्य केली पाहिजे. कोणत्याही शुभ कार्याअगोदर यांची पूजा करणे गरजेचे आहे.
3. पूजेमध्ये शिळे फुलं कधीही वापरू नयेत. शास्त्रानुसार गंगाजल, तुळशीचे पान, बेलाचे पान आणि कमळ हे कोणत्याही स्थितीमध्ये शिळे होत नाहीत.
4. लिंगार्चन चंद्रिकानुसार सूर्यदेवाला सात, श्रीगणेशाला तीन, विष्णूला चार आणि महादेवाला तीन प्रदक्षिणा घालाव्यात. काही ग्रंथानुसार महादेवाला अर्धी प्रदक्षिणा घालावी.
5. विष्णूदेवाला प्रसन्न करण्यासाठी पिवळ्या रंगाचे रेशमी वस्त्र अर्पण करावे तसेच शक्ती आणि सूर्य, श्रीगणेशाला प्रसन्न करण्यासाठी लाल रंगाचे वस्त्र अर्पण करावे. महादेवाला प्रसन्न करण्यासाठी पांढऱ्या रंगाचे वस्त्र अर्पण करण्याचे विधान आहे.
6. महादेवाला कधीही शंखाने जल आणि हळद अर्पण करू नये. शास्त्रानुसार हे दोनी काम शिव पूजेत वर्ज्य आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.