आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साडेचार वर्षांत भाजपने साेलापूरसाठी काय केले? माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा सवाल

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अक्कलकोट- काँग्रेस पक्षाच्या काळात झालेल्या कामाचे मोदी उद्घाटन करत आहेत. साडेचार वर्षात सोलापूरसाठी कोणती कामे केली, याचे उत्तर सत्ताधाऱ्यांनी द्यावे. उजनीचे पाणी अक्कलकोटला मिळावे, यासाठी मी आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांच्या पाठीशी आहे. सत्ताधाऱ्यांच्या खोट्या भूलथापांना बळी पडू नका. काम करणाऱ्या माणसांना निवडून द्या, असे आवाहन शिंदे यांनी केले. बिंजगेर येथे धनगर समाज मेळावा, विविध विकासकामांच्या उद््घाटन व भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. 

 

शिंदे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्तेवर येण्यासाठी आश्वासनांचा पाऊस पाडला. धनगर समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन दिले. महाराष्ट्र सरकारने केंद्राकडे धनगर समाजाला आरक्षण मिळावे याची शिफारस केली नाही. साडेचार वर्षात खोटे बोलून जनतेला फसवण्याचे काम नरेंद्र मोदी व देवेंद्र फडणवीस सरकारने केले. दोन कोटी युवकांना नोकऱ्या देऊ, असे मोदी यांनी सांगितले होते. पण अडीच कोटी नोकऱ्या कमी केल्या. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते सातलिंगप्पा म्हेत्रे होते. 

 

आमदार सिद्धाराम म्हेत्रे म्हणाले, काँग्रेस पक्षातच शेवटच्या माणसाचा विचार केला जातो. काम करणाऱ्या लोकांना निवडून द्या. भाजपच्या लोकांनी भूलथापा मारून सत्ता उपभोगली. निवडणुकीच्या आधी १५ लाख रुपये देऊ, असे सांगितले होते. पण ते अद्याप मिळाले नाहीत. आगामी निवडणुकीत शिंदे यांच्या पाठीशी राहा.

 

पंचायत समितीचे माजी सदस्य चंद्रकांत बिराजदार यांचा नागरी सत्कार करण्यात आला. बाजार समितीचे उपसभापती श्रीशैल नरोळे, चेतन नरोटे, शिवराज म्हेत्रे, पंचाय समितीचे उपसभापती प्रकाश हिप्परगी, नगरसेवक अश्पाक बरोळगी, पंचायत समिती सदस्य विलास गव्हाणे, अरुण जाधव उपस्थित होते. 
 

बातम्या आणखी आहेत...