Home | TV Guide | What Exactly Does Amitabh Bachchan See On His KBC Computer Screen

KBC-10 : बिग बींना कॉम्प्युटर स्क्रिनवर प्रश्न, ऑप्शनव्यतिरिक्त आणखी काय काय दिसते? पहिलेच ठाऊक असतात का उत्तरे?

दिव्य मराठी वेब टीम | Update - Sep 12, 2018, 02:07 PM IST

लोकांचे नशीब चमकवणा-या 'कौन बनेगा करोडपती' या शोचे दहावे पर्वही हिट होत आहे.

 • What Exactly Does Amitabh Bachchan See On His KBC Computer Screen

  एंटरटेन्मेंट डेस्कः लोकांचे नशीब चमकवणा-या 'कौन बनेगा करोडपती' या शोचे दहावे पर्वही हिट होत आहे. शोमध्ये प्रश्नोत्तरांसोबतच अनेक मजेशीर किस्से समोर येत आहेत. KBC मधील अमिताभ यांचा अंदाज लोकांना पसंत पडतो. या शोमधील आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे, ज्याच्याशिवाय शो पुढे जाऊच शकत नाही, ते म्हणजे 'कम्प्यूटर जी'. शोमध्ये अमिताभ अनेकदा कॉम्प्युटरशी बोलताना दिसतात. पण अमिताभ आणि स्पर्धकांच्या कॉम्प्युटरवर नेमके काय येत असते, त्यांच्या कॉम्प्युटरमध्ये काय अंतर असतं? हे तुम्हाला ठाऊक आहे का...

  अमिताभ यांची कॉम्प्युटरची स्क्रिन
  अमिताभ आणि स्पर्धकांचे कॉम्प्युटर दिसायला सारखे असतात. पण दोघांच्या प्रोग्रामिंगमध्ये बराच फरक असतो. शोमध्ये अनेकदा असेही स्पर्धक आले आहेत, ज्यांनी हॉट सीटवर नव्हे तर अमिताभ बच्चन यांच्या सीटवर बसून हा गेम खेळला आहे. खरं तर अमिताभ यांच्या कॉम्प्युटरच्या स्क्रिनवर प्रश्नासोबतच त्याचे उत्तर येत असावे, असे तुम्हाला वाटत असेल, पण असे नाहीये.

  कंटेस्टंटनी सांगितले स्क्रिनचे सत्य..

  'कौन बनेगा करोडपती'च्या 10 व्या पर्वात 12.5 लाख रुपये जिंकणारे स्पर्धक अभिनव पांडे यांनी अमिताभ त्यांच्या समोरच्या कॉम्प्युटर स्क्रिनवर नेमके काय काय बघू शकतात, याविषयीची माहिती दिली. अभिनव यांनी सांगितले, जेव्हा ते हॉट सीटवर पैसे जिंकून फास्टेस्ट फिंगर फर्स्ट कंटेस्टंटच्या रुपात अमिताभ यांच्या अगदी मागे बसले होते. तेथून त्यांना अमिताभ बच्चन यांची स्क्रिन स्पष्ट दिसत होती. अमिताभ त्यांच्या कॉम्प्युटरवर कंटेंट स्‍किप करण्यासोबतच तो ऑपरेटही करु शकतात. टाइमर आणि प्रश्न सेट करणारा कॉम्प्युटर ऑपरेटर दुस-या ठिकाणी बसलेला असतो. या सर्व गोष्टी अभिनव यांनी Quora वर शेअर केल्या होत्या.

  उत्तर दाखवत नाही 'कम्प्यूटर जी'
  अमिताभ यांना प्रश्नाचे उत्तर आधीच ठाऊक असावे, असे अनेकांना वाटत असले. पण असे नाहीये. प्रश्नाचे उत्तर लॉक होईपर्यंत बिग बींच्या कॉम्प्युटर स्क्रिनवर उत्तर दिसत नाही. जेव्हा ते उत्तर लॉक करतात त्यानंतरच त्यांना उत्तराशी निगडीत डिटेल्स स्क्रिनवर वाचू शकतात.

  हे डिटेल दाखवतात 'कम्प्यूटर जी'
  अमिताभ यांच्या 'कम्प्यूटर जी'च्या स्क्रिनवर प्रश्न, ऑप्शन, लाइफलाइन्स यांसारख्या सर्व गोष्टी दिसतात. जर बिग बी एखाद्या स्पर्धकाचे नाव, शहर, जॉब किंवा गावाविषयी विसरले तर त्यांच्या कॉम्प्युटर स्क्रिनवर संबंधित सर्व माहिती उपलब्ध असते. अमिताभ बच्चन यांच्या स्क्रिनच्या आणखी एका विंडोमध्ये 'फोन अ फ्रेंड' नॉमिनीटे डिटेल्स दिसतात. स्क्रिनवर लागलेले टाइमर त्यांना ब्रेकविषयी सांगते. फास्टेस्ट फिंगर फर्स्टच्या वेळी ही स्क्रिन ऑफ असते.

Trending