आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईत रात्री उशिरापर्यंत पार्टी करत होता ख्रिस गेल, थोड्यावेळाने पोहोचले पोलिस, त्यानंतर गेलने त्यांना दिली अशी \'झप्पी\'

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट्स डेस्क - आयपीएलमुळे जगभरातील अनेक विदेशी क्रिकेटर्सचे मोठ्या प्रमाणावर भारतीय चाहते तयार झाले आहेत. त्याचप्रमाणे अनेक विदेशी क्रिकेटर्सचाही भारतावर जीव जडला आहे. अनेकदा विविध कामांनिमित्त हे क्रिकेटर्स भारतात येत असतात. असाच एक क्रिकेटपटू म्हणजे ख्रिस गेल. त्याला भारतात राहायला काम करायला प्रचंड आवडते. सध्या एका शुटिंगच्या निमित्ताने तो मुंबईत आहे. मुंबईत त्याने नुकतीच एका पबमध्ये चांगलीच मस्ती केली. पण पबमध्ये ही पार्टी सुरू असतानाच पोलिस पार्टी थांबवायला पोहोचले आणि मग घडले असे. 

 
ख्रिस गेसलने स्वतःच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये काही पोस्ट करत याबाबत सांगितले आहे. ख्रिस गेलने यावेळी आलेल्या पोलिसांबरोबर फोटो काढले. एका पोलिसाच्या बाईकवर बसूनही ख्रिस गेलने फोटो काढले. तसेच एका पोलिस अधिकाऱ्याला गेलने झप्पीही दिली. पोलिस क्रमचाऱ्यांनीही गेलबरोबर फोटो काढून घेतले. मला भारताचा कायदा आवडतो आणि कायद्याचा नेहमीच विजय होतो असेही गेलने पोस्टमध्ये म्हटले आहे. 

 

या पार्टीत गेलबरोबर लारादेखिल होता अशी माहितीही मिळाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर असलेला गेल हा सध्या आयपीएलमध्ये प्रितीच्या किंग्स इलेव्हन पंजाब संघात आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...