Home | Khabrein Jara Hat Ke | What Happens After Death, Scientist Got This Clue

मृत्यूनंतर व्यक्तीला नेमके कसे वाटते, रिसर्चमध्ये समोर आल्या अचंबित करणा-या अनेक गोष्टी

दिव्य मराठी वेब टीम | Update - Nov 06, 2018, 01:55 PM IST

हिंदु धर्म ग्रंथांनुसार, अशी मान्यता आहे, की मृत्यूनंतर व्यक्तीची आत्मा स्वतःच्या शरीराला बघू शकते.

 • What Happens After Death, Scientist Got This Clue

  मृत्यूनंतरचे विश्व कसे असते? मृत झाल्यानंतर त्या व्यक्तीला नेमके काय वाटते? जगातील सर्वात कठीण प्रश्नांची उत्तरे शोधताना न्यूयॉर्कच्या एका रिसर्च टीमने अनेक अचंबित करणा-या गोष्टींचा खुलासा केला आहे. रिसर्चमध्ये दावा करण्यात आला आहे, की त्यांना असे काही क्लूज मिळाले आहेत ज्यावरुन अनेक रहस्यांचा उलगडा होऊ शकतो. New York University Langone School of Medicine च्या एका रिसर्च टीमनुसार, मरणा-या व्यक्तीला काही काळ त्याच्या अवतीभोवती घडणा-या घटनांचा भास होत असतो.

  टीमने केला हा प्रयोग...
  - रिसर्चर्सच्या टीमने हार्ट अटॅक किंवा दुस-या कुठल्या कारणामुळे मृत घोषित झालेल्या पण नंतर पुन्हा जीवित झालेल्या व्यक्तींवर रिसर्च केला. युनिव्हर्सिटीचे डायरेक्टर Dr. Sam Parnia यांनी सांगितले, हे खरे आहे, की हृदय बंद पडल्यानंतर मेंदूपर्यंत रक्त पोहोचणे बंद होते आणि मेंदू काम करणे बंद करतो. पण अशा काही घटना समोर आल्या आहेत, जेव्हा मृत व्यक्तीचा मेंदू बंद पडल्यानंतरसुद्धा त्यांना त्यांच्या शेजारी घडणा-या घटनांचा आभास झाला.


  - मृत घोषित झालेल्या पण नतंर जीवित झालेल्या अशा लोकांनी त्यांच्यासोबत निधनानंतर घडलेल्या घटनांचा अचुक तपशील दिला. खरं तर एकदा मृत घोषित केलेल्या व्यक्तीसोबत अशी घटना घडणे अशक्य असते. आता Dr. Sam ची टीम अशा गोष्टींचा शोध घेत आहे, ज्यावरुन मृत्यूनंरचा अनुभव कसा असतो, तो नेमक्या पद्धतीने सांगितला जाऊ शकेल. त्यांच्या मते, व्यक्तीच्या मेंदूत असा एक घट आहे, ज्यामुळे मृत्यूनंतरचे काही क्षण मेंदू अॅक्टिव असतो.

  नष्ट होते मेंदूची शक्ती...
  याउलट 2013 साली University of Michigan ने केलेल्या रिसर्चमध्ये म्हटले गेले होते, की व्यक्तीचा मृत्यू होताच मेंदू नष्ट होतो. त्यामुळे आता करण्यात आलेल्या दाव्यावरुन प्रश्न उपस्थित होतो, की जर व्यक्ती मेल्यानंतर त्याचा मेंदू काम करणे बंद करतो, तर मग त्याला त्याच्या आजुबाजुला घडणा-या गोष्टींचा भास कसा होतो.


  पुढे वाचा आणखी काही खास गोष्टी..

 • What Happens After Death, Scientist Got This Clue
  हिंदु धर्म ग्रंथांनुसार, अशी मान्यता आहे, की मृत्यूनंतर व्यक्तीची आत्मा स्वतःच्या शरीराला बघू शकते. त्याला त्याच्या अवतीभोवतीच्या सर्व गोष्टी दिसतात.
 • What Happens After Death, Scientist Got This Clue
  मृत्यूनंतर नेमके काय घडते, या प्रश्नावर Flatliners नावाचा हॉलिवूड सिनेमा तयार झाला आहे.
 • What Happens After Death, Scientist Got This Clue
  सिनेमात दाखवण्यात आले आहे, मृत्यूनंतर नेमके काय घडते हे जाणून घेण्यासाठी पाच मित्र कशाप्रकारे स्वतःचे हृदय बंद पाडतात.

Trending