Home | Gossip | what happens If Game of Thrones was made in Bollywood

जर बॉलीवूडमध्ये गेम ऑफ थ्रोन्स सीरिज बनली असती तर रनबीरने निभावले असता जॉन स्नोचे पात्र, आलिया बनली असती डेनेरीस टारगेरिअन, जाणून घ्या अजून कोणी कोणते पात्र साकारले असते...

दिव्य मराठी वेब टीम | Update - Mar 17, 2019, 03:45 PM IST

इतर पात्रांसाठीही बॉलीवूडचे काही चेहरे निवडले गेले असते

 • what happens If Game of Thrones was made in Bollywood

  बॉलीवूड डेस्क- सध्याच्या काळात 'गेम ऑफ थ्रोन्स' लोकप्रिय टीव्ही शोपैकी एक आहे. या शोचे प्रत्येक सीजन आणि त्यातील पात्र नेहमीच चर्चेत असतात. या शोचे आतापर्यंत 7 सीजन आले आहेत आणि शेवटचा सीजन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येमार आहे. पण तुम्ही विचार केला आहे का, जर गेम ऑफ थ्रोन्स भारतात बनला असता तर कोणत्या बॉलीवू़ड कलाकारने कोणते पात्र निभावले असते. सध्या रणबीर कपुर आणि आलिया भट्‌ट सगळ्यात जास्त लोकप्रिय आहेत. त्यामुळेच रणबीरला जॉन स्नो आणि आलियाला डेनेरीस टारगेरिअन पात्र सुट झाले असते.


  जॉन स्नोच्या पात्रात रणबीर
  रणबीर कपुर नेड स्टार्कच्या अनैतिक संबंधातून जन्मलेल्या मुलाच्या पात्रासाठी बेस्ट ऑप्शन असता. रणबीर, त्याच्या आगामी शमशेरा आशाच काहीशा दिसणाऱ्या रूपात प्रेक्षकांसमोर येणार आहे. रणबीरला कोणत्याही मोठ्या अभिनेत्यासोबत काम करताना त्या अभिनेत्याच्या तोडीस तोड काम करतो. त्यामुळेच प्रकाश झाचा चित्रपट राजनीति पाहून कळते की, रणबीरने अजय देवगन, मनोज वाजपेयीसोबतच नाना पाटेकरलाडी लाजवेल असा अभिनय केला आहे.

  डेनेरीस टारगेरिअनच्या पात्रार आलिया
  डेनेरीस टारगेरिनच्या पात्रासाठी बॉलीवूडच्या दोन अभिनेत्रींना विचारात घेतले जाउ शकते. पहिली म्हणजे दीपिका पादुकोण आणि दुसरी आलिया भट्‌ट. कारण हे पात्र हट्टी आणि क्रुर आहे. त्यामुळेच दीपिका आण आलिया या पात्रासाठी बेस्ट ऑप्शन ठरू शकतात. ड्रॅगन क्वीन चे पात्र साकारताना या अभिनेत्रींना आपली ग्रेड शेड दाखवावी लागेल आणि यात आलिया चांगली भुमिका निभावू शकते.


  क्रेसीच्या पात्रात करीना कपूर-खान
  या पात्रासाठी प्रियंका चोपड़ा आणि करीना कपूर-खान या दोन अभिनेत्री चांगले काम करू शकतात. पण या दोघींमध्येही करीना उत्कृष्ठ काम करू शकेल, कारण या पात्रात जी क्रुरता आणि चार्म आहे तो करीनाकडे प्रियंकापेक्षा जास्त आहे. त्यामुळेच क्रेसीच्या पात्रासाठी करीना एकदम परफेक्ट आहे.

  जेमी लॅनिस्टरच्या पात्रात अक्षय कुमार
  जेमी लॅनिस्टरच्या भुमिकेसाठी बॉलीवुडचा खिलाड़ी कुमार शिवाय दुसरा कोण चांगला अभिनेता असू शकतो. अक्षय नेहमी कठीण रोल करत असतो आणि आजही त्याने अशा कामाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर भुरळ घातली आहे. अक्षय चांगली आणि वाईट अशा दोन्हीप्रकारच्या भुमिका करण्यात माहिर आहे. तसेच अक्षयची फिजीक आणि फिटनेस या पात्रासाठी एकदम चांगली ठरू शकते.

  पुढील स्लाइडवर पाहा पात्रांची काही फोटोज...

 • what happens If Game of Thrones was made in Bollywood
 • what happens If Game of Thrones was made in Bollywood
 • what happens If Game of Thrones was made in Bollywood

Trending