आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई - 2008 च्या दहशतवादी हल्ल्यास 10 वर्षे होत आहेत. दशकानंतरही हल्ल्याच्या जखमा भरलेल्या नाहीत आणि कधी भरणारही नाहीत. पाकिस्तानच्या 10 दहशतवाद्यांनी देशाची अख्खी आर्थिक राजधानी वेठीस धरून 166 जणांचा जीव घेतला. त्यापैकी एकमेव दहशतवादी अजमल आमिर कसाबला याला जिवंत पकडण्यात आले होते. या नराधमाला पकडल्यानंतर त्याच्या चौकशीसाठी माजी लष्करी अधिकारी ब्रिगेडिअर गोविंद सिंह सिसोदिया यांची निवड करण्यात आली होती. त्यांनी एका प्रसिद्ध इंग्रजी दैनिकाशी संवाद साधून त्यावेळी नेमके काय घडले आणि कशा स्वरुपाची प्रश्नोत्तरे झाली त्याची आठवण काढली. त्यामध्ये एक प्रश्न असाही होता की तुला माफ करून सोडून दिल्यास काय करशील. त्यावर कसाबचे काय उत्तर होते याचाही खुलासा ब्रिगेडिअर सिसोदिया यांनी केला.
सिसोदिया यांनी त्यावेळी मुंबईच्या जेलमध्ये बंद करण्यात आलेल्या कसाबची मुलाखत घेण्यापूर्वी त्याचा परिपूर्ण अभ्यास केला होता. 166 जणांचा जीव घेणारा कसाबला कशा प्रकारे बोलके करता येईल. सोबतच त्याला जास्तीत-जास्त मोकळेपणाने बोलता यावे यासाठी कोणत्या भाषेचा वापर करता येईल याची तयारी देखील सिसोदिया यांनी केली होती. त्यांनी कसाबला इंटरॉगेशनप्रमाणे प्रश्न न विचारता इमोशनल प्रश्न विचारून जास्तीत-जास्त माहिती काढून घेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळेच त्यांनी कसाबला "तुला सोडून दिल्यानंतर काय करशील?" असा प्रश्न विचारला होता.
घरी जाऊन आई वडिलांची सेवा करेन...
एक फिदाईन अर्थात मरण्यासाठीच भारतात आलेला दहशतवादी कसाबकडून माहिती काढणे हे खूप मोठे आव्हान होते. ब्रिगेडिअर सिसोदिया कसाबची चौकशी करणाऱ्या मोजक्या अधिकाऱ्यांपैकी एक होते. त्यांनी सुरुवातीला कसाबला हिंदी आणि उर्दू अशा संमिश्र भाषेत बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र, कसाब मध्येच पंजाबी शब्द जास्त वापरत होता. हे पाहून त्याला आणखी कम्फर्टेबल करण्यासाठी सिसोदिया यांनी पंजाबी भाषेतच प्रश्न विचारले. त्यात त्यांनी कसाबला विचारले, तुला माफ करून परत पाकिस्तानात सोडून दिले तर काय करशील? त्यावर कसाब इमोशनल झाला. म्हणाला, मी घरी जाऊन आई-वडिलांची सेवा करेन. इतक्या प्रश्नांमध्ये हा एकच प्रश्न होता ज्याचे उत्तर देताना कसाब भावूक झाला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.