आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराब्रिटनमधील रहिवासी एमी टेलर डोकेदुखीमुळे खूप त्रस्त झालेली होती. त्रास एवढा वाढला होता की, एका दिवशी आत्महत्या करण्याचा तिने निर्णय घेतला. तिच्या डोक्यात काहीतरी सरपटत असल्याचा तिला भास व्हायचा आणि भयंकर वेदनांमुळे अनेक दिवस ती बेडवरून उठूही शकत नव्हती. एकदा सुसाइड अटेम्प्टही केला होता. यानंतर एमी डॉक्टरांकडे पोहोचली. तेथे चेकअपमध्ये कळले की, तिला जगातील सर्वात दुर्लभ आजार आहे.
आधी समजत होती मायग्रेन...
- एमी 20 वर्षांपासून या वेदनांमुळे त्रस्त होती. दीर्घ काळापासून ती याला मायग्रेन समजत होती. परंतु जेव्हा वेदना असह्य झाल्या तेव्हा डॉक्टर म्हणाले की, तिला Arnold-Chiari malformation नावाचा आजार आहे..
- वास्तविक, या आजारात मेंदू वाढायला लागतो. तो आपल्या जागेपासून वाढत जाऊन मणक्याच्या हाडाकडे सरकू लागतो. याच कारणामुळे एमीला भयंकर वेदना होत होत्या. डॉक्टरांनी सीटी स्कॅनमध्ये पाहिले की, तिच्या मेंदूचा खालचा भाग मणक्याच्या हाडाच्या पुढे आलेला होता.
मित्रांनी मला घातली अंघोळ
एमीने सांगितले की, तिला एवढ्या भयंकर वेदना होत होत्या की, ती अंथरुणाला खिळून राहत होती. तिला वाटायचे की, तिचा मेंदू फुटूनच जाईल. अनेक आठवडे तिला टॉयलेटलासुद्धा जाता येत नव्हते. अनेकदा तर तिच्या मित्रांनी तिला अंघोळ घातली. एमी म्हणाली, ''हे खूप लाजिरवाणे होते. अशा आयुष्यामुळे मी कंटाळून मी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला होता.''
का होतो हा आजार?
डॉक्टरांच्या मते, हा आजार जन्मापासूनच होतो. जन्मादरम्यान मेंदूचा भाग अशा प्रकारचे वाढतो आणि यामुळे भयंकर वेदना, धूसर दिसणे आणि सातत्याने उलट्या होणे, यासारखे त्रास होतात. जर ट्रीटमेंट केली नाही, तर त्या रुग्णाचा मृत्यू होते.
आता लोकांना जागरूक करत आहे एमी
एमी आता या दुर्लभ आजारामधून हळूहळू बाहेर येत आहे. ती म्हणाली की, अशा आजारामुळे ग्रस्त लोकांची मदत करण्याची तिची इच्छा आहे. एमीने एक फेसबुक पेज बनवले आहे, ज्यावर ती या आजाराबद्दल लोकांना सांगते. तिचे म्हणणे आहे की, लोक नेहमी याला मायग्रेनच्या वेदना समजतात, परंतु अशा वेदनांकडे दुर्लक्ष करू नये.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.