आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुक्कुपालन व्यवसायातून 1 लाखापर्यंत मिळू शकते मासिक उत्पन्न, व्यवसाय उभारणीसाठी सरकारकडून मिळते अनुदान; अशाप्रकारे करा कुककुटपालन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली : आपण जर नोकरी ऐवजी व्यवसाय करू इच्छित असला तर बर्ड फार्मिंग आपल्यासाठी उत्तम पर्याय असू शकतो. यामध्ये कुककुटपालन चांगला पर्याय आहे. आपण फक्त 1500 कोंबड्यांपासून कुककुटपालनाला सुरूवात केली तरी आपल्याला प्रति महिना 50 हजार ते 1 लाख रूपयांचे उत्पन्न मिळू शकते. यासाठी तुम्हाला सुरुवातीला 7 ते 8 लाख रूपयांची गुंतवणूक करावी लागणार आहे. आपण योग्यरित्या प्रशिक्षण घेऊन फार्मिंगचा व्यवसाय सुरू केला तर पहिल्याच वर्षी तुम्ही केलेल्या गुंतवणूकीची परतफेड होईल आणि तुम्हाल चांगला नफा सुद्धा मिळेल. आज आम्ही तुम्हाल या व्यवसायाविषयीची माहिती सांगत आहोत. 

 
5 ते 6 लाख रूपये येईल खर्च 
आपण 1500 कोंबड्यांपासून सुरुवात करणार असताल तर यासाठी बिल्डिंग, पिंजरे आणि इक्विपमेंट इत्यादींवर जवळपास 5 ते 6 लाख रूपये खर्च येतो. हरियाणा लेअर व ब्रॉयलर्स कंपनीचे मालक सुजीत सिंह यांना सांगितले की, लेअर फार्मिंग हा मोठ्या प्रमाणात केली जाते. पण आजकाल शेतकरी आणि युवापिढी थोड्याफार प्रमाणात करत आहेत. लेअर फार्मिंग सुरू करण्यासाठी तुम्हाला योग्य प्रशिक्षण घेणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. 

 

20 आठवड्यांपर्यंत द्यावा लागतो आहार

आपल्याला 1500 कोंबड्यांपासून सुरुवात करण्यासाठी सुरुवातीला 1650 पिल्ले मागवावे लागतील. कारण एखाद्या काही कारणास्तव कोंबड्या मरण पावल्या तर तुमचे चक्र बिघडणार नाही.  सध्या एक लेअर बर्ड जोडी 30 ते 35 रूपयांना मिळते. 1500 बर्ड विकत घेण्यासाठी 50 हजार रूपये खर्च करावे लागणार आहे. त्या पिल्लांना 20 आठवड्यापर्यंत विविध प्रकारचे अन्न द्यावे लागते. यावर अंदाजे 1 ते दीड लाख रुपये खर्च येतो. 

 

20 आठवड्यांनंतर अंडे उत्‍पादनाला होते सुरुवात 

एक जोडी वर्षभरात साधारणतः 290 ते 304 अंडे देतात. 20 आठवड्यांनंतर कोंबड्या अंडे देण्यास सुरुवात करतात. वर्षभरापर्यंत हे उत्‍पादन सुरू असते. 20 आठवड्यांनंतर यांच्या खाद्याचा खर्च 3 ते 4 लाख रूपयांपर्यंत वाढतो. अशातच 1500 कोंबड्यापासून प्रतिवर्ष 290 अंडेप्रमाणे सरासरी 4,35,000  अंड्यांचे उत्‍पादन मिळते. 


प्रति अंड्याला 3.5 रू मिळतो दर  

आपण वर्षाला 4 लाख 35 हजार पैकी 4 लाख अंड्यांची विक्री केली तर सध्याच्या दरानुसार वर्षभरात 14 लाख रुपयांचे उत्पन्न मिळेल. यामध्ये कोंबड्यांचा खरेदी 50 हजार, त्यांचे खाद्य 1.5 लाख आणि वर्षभरातील खाण्यावर आलेला 4 लाख रूपये खर्च वगळला तर 8 लाख रूपये शिल्लक राहतात. यामध्ये इन्‍फ्रास्‍ट्रक्‍चर आणि मजूरीचा जवळपास 6 लाख रूपये खर्च वगळला तर वर्षाच्या सुरुवातीची कमाई 2 लाख रूपये असेल. इन्‍फ्रास्‍ट्रक्‍चरवर एकदाच खर्च करावा लागणार आहे. त्यानंतर दरवर्षी 8 लाख रूपये म्हणजेच 70 हजार रूपये प्रतिमहिना तुम्हाला उत्पन्न मिळेल. 

 
25 ते 35 टक्के अनुदान मिळण्याची सुविधा

विविध राज्यात कु्क्कुटपालनासाठी अनुदान आणि कर्जाची सुविधा उपलब्ध आहेत. कक्कुट विकास निती 2013 अंतर्गत अनुदान देण्यात येते. 

बातम्या आणखी आहेत...