आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Alert : पेंटिंग शिकवण्याच्या बहाण्याने टिचर 6 वर्षाच्या मुलीची काढायचा छेड, असा झाला खुलासा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोलकाता - कोलकात्याच्या केष्टोपूरच्या एका प्रायव्हेट स्कूल टिचरवर तीन विद्यार्थिनींची छेड काढल्याचा आणि अश्लिल कृत्य केल्याचे प्रकरण समोर आले आहे. छेडछाडीची माहिती मिळाल्यानंतर रागावलेले नातेवाई शाळेत पोहोचले आणि त्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. नातेवाईकांनी शाळेत घुसून शिक्षकाला मारहाण केल्याचा आरोप होत आहे. काही वेळाने पोलिस येथे पोहोचले आणि आरोपीला अटक केली. 


पेंटिंगच्या बहाण्याने करायचा छेडछाड 
मीडिया रिपोर्ट्सनुसार शाळेत नर्सरी ते चौथ्या वर्गापर्यंतचे शिक्षण दिले जाते. आरोपी शिक्षक दिब्येंदू शाळेतील तीन मुलींबरोबर पेंटिंग शिकवण्याच्या नावाखाली गैरवर्तन करत होता. 


मुलांना गुड टच बॅड टट शिकवा 
>> तुमचे मुल चार वर्षांचे झाल्यानंतर त्याच्याशी याबाबत चर्चा सुरू करा. कोणावर विश्वास ठेवावा आणि कोणावर नाही हे त्याला सांगा. एखादा अनोळखी व्यक्ती त्याला काही खायला देत असेल तर ते लगेच खाऊ नये हे समजवावे. 
>> मुलांना गुड टच किंवा बॅड टच बाबत माहिती देताना संयमाने काम घ्यावे लागेल. त्यांना कदाचित या गोष्टी समजायला वेळ लागू शकतो. त्यांना त्यांच्या प्रायव्हेट पार्टबाबत माहिती द्या. त्याठिकाणी त्यांच्याशिवाय इतर कोणी हात लावू शकत नाही हे त्यांना सांगा. 
>> मुलाशी मोकळेपणाने बोला त्याला तुमच्याशी बोलण्यात संकोच वाटता कामा नये. काही सांगितले तर तुम्ही रागावाल  किंवा ऐकनार नाही अशी भावना त्याच्या मनात येता कामा नये. 
>> काही वाईट किंवा घाणेरडे वाटत असेल तर घरी सांगायला हवे हे मुलाला समजवावे. 
>> मुलाने कोणाच्याही फार जवळ जाऊ नये हे त्याला सांगावे. कोणी त्याला उचलून घेत असेल किंवा पप्पी घेत असेल तर नकार द्यायला शिकवा. 

बातम्या आणखी आहेत...