आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

#MeToo : \'साजिद खानने मला गुप्तांग दाखवले, हात लावायला सांगितले\' अॅक्ट्रेसच्या या आरोपानंतर पुन्हा चर्चेत सेक्शुअल हरॅसमेंट शब्द; तज्ज्ञांनी सांगितले- \'या\' छोट्या-छोट्या गोष्टीही ठरू शकतात गुन्हा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूज डेस्क - सध्या दिवसरात्र #MeToo मोहिमेशी निगडित नवनवे किस्से समोर येत आहेत. नाना पाटेकर आणि तनुश्री दत्तापासून सुरू झालेल्या या वादळात आता बॉलीवुडसोबतच राजकारणी आणि क्रिकेटशी संबंधित अनेकांची नावे समोर आलेली आहेत. डायरेक्टर साजिद खानवर त्याच्या माजी असिस्टंट डायरेक्टर आणि अॅक्ट्रेस सलोनी चोप्राने सेक्शुअल हरॅसमेंटचा आरोप ठेवला आहे. सलोनीचे म्हणणे आहे की, साजिदने तिला बिकिनी फोटोज मागितले. अनेक वेळा चुकीचा स्पर्श केला. एवढेच काय, कामादरम्यान त्याने माझा हात पकडून आपल्या प्रायव्हेट पार्टकडे खेचला. जेव्हा तिने नकार दिला, तेव्हा साजिदने आपली पँट उघडून दाखवले.

 

#MeToo मोहिमेत गायक अभिजित भट्टाचार्या आणि लेखक सुहेल सेठ यांच्यावर बळजबरी किस केल्यामुळे सेक्शुअल हरॅसमेंटचा आरोप करण्यात आला आहे. यामुळे प्रश्न उठतो की, अशा कोणत्या छोट्या-छोट्या गोष्टी आहेत, ज्या एखाद्या व्यक्तीला सेक्शुअल हरॅसमेंटचा आरोपी करू शकतात. याबाबत मध्य प्रदेश हायकोर्टातील सीनियर अॅडव्होकेट संजय मेहरा यांनी सर्व गोष्टींबाबत सविस्तर माहिती दिली.

 

सेक्शुअल हरॅसमेंटची सर्वात छोटे प्रकार

> एखादी तरुणी अथवा महिलेचा पाठलाग करणे.
> एखादी तरुणी अथवा महिलेला वाईट हेतून पाहणे.
> एखाद्या तरुणीला अथवा महिलेला बळजबरी संपर्क करणे.
> एखादी तरुणी अथवा महिलेचा लपून फोटो काढणे.
> एखादी तरुणी अथवा महिलेचा वाईट हेतून स्पर्श करणे.

 

IPCचे कलम 354 मध्ये छेडछाडीची परिभाषा

एखाद्या महिलेला शारीरिक आणि मानसिक पीडा दिल्यास या कलमाअंतर्गत कारवाई होईल. शारीरिक पीडाचा अर्थ म्हणजे महिलेला तिच्या मर्जीविरुद्ध अथवा वाईट हेतूने स्पर्श करणे, अथवा कोणत्याही प्रकारे तिच्या शरीराला हानी पोहोचवणे. दुसरीकडे, मानसिक पीडेचा अर्थ आहे की, महिलेला लपून रोखून पाहणे, चुकीच्या पद्धतीने पाहणे, तिच्या मर्जीविरुद्ध फोटो काढणे अथवा तिच्या फोटोचा दुरुपयोग करणे, तिच्या मर्जीविरुद्ध चुकीचे साहित्य, फोटो वा व्हिडिओ दाखवणे.

 

निर्भया केसनंतर सेक्शन 354 मध्ये करण्यात आले बदल

संजय मेहरा म्हणाले की, निर्भया केसनंतर IPC चे कलम 354 मध्ये खूप बदल करण्यात आले आहेत. आता याला अँटी रेप लॉ म्हटले जाते. यानंतर सेक्शुअल हरॅसमेंटच्या कंडिशनमुळे कमीत कमी 1 वर्षांची शिक्षा होईल. यात जामीनही मिळणार नाही.

> अँटी रेप लॉ 2013 पासून लागू झालेला आहे. यात IPCचे कलम-354 मध्ये अनेक सब सेक्शन्स जोडण्यात आले आहेत. यात छेडछाडशी निगडित गुन्ह्यांसाठी वेगवेगळ्या शिक्षेची तरतूद आहे.

> IPC चे कलम- 354 ए, 354 बी, 354 सी आणि 354 डी बनवण्यात आले आहेत. कलम 354 एकचे चार भाग आहेत. एखादा व्यक्ती एखाद्या महिलेला सेक्शुअल नेचरचा फिजिकल टच करतो किंवा असे कंडक्ट दाखवतो, तर 354 ए पार्ट 1 लागेल. यात 1 वर्षांच्या शिक्षेची तरतूद आहे.

> सेक्शुअल डिमांड केल्यास भाग 2, मर्जीविरुद्ध पोर्न दाखवल्यास पार्ट 3 आणि सेक्शुअल कलरच्या कंमेंटवर पार्ट 4 लागेल. या सर्व भागांमध्ये 3 वर्षांपर्यंतच्या शिक्षेची तरतूद आहे.

> जर एखादा पुरुष एखाद्या महिलेला बळजबरी विवस्त्र करतो अथवा तिला भाग पाडत असेल, तर कलम-354 बी अंतर्गत केस दाखल होईल. यात दोषीला 3 वर्षांपासून ते 7 वर्षांपर्यंतच्या कैदेच्या शिक्षेची तरतूद आहे. यात जामीनही मिळणार नाही.

> महिलेचा लपून फोटो घेणे आणि तो शेअर केल्यास IPC चे कलम-354 सी लागेल. यात दोषीला एक वर्षापासून 3 वर्षांपर्यंतच्या कैदेची तरतूद आहे.

> दुसऱ्यांदा दोषी आढळल्यास 3 ते 7 वर्षे कैदेची शिक्षा होईल. यात जामीन मिळणार नाही.

> जर एखाद्या तरुणीचा अथवा महिलेचा पाठलाग केला जात असेल किंवा बळजबरी संपर्क करण्याचा प्रयत्न केला जात असेल, तर यात IPC चे कलम-354 डी अंतर्गत कारवाई होईल. यात दोषीला 3 वर्षांपर्यंत कैद होऊ शकते. 

> याशिवाय, सेक्शुअल हरॅसमेंटच्या इतर कोणत्याही प्रकारात 7 वर्षांची शिक्षा मिळेल. शिक्षेत जामीन नाही. कोर्ट यात दंडही ठोठावू शकते.  

 

 

 

बातम्या आणखी आहेत...