आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दहा टक्के आरक्षणाचा आता काय फायदा ? मोदींचा हा नवा जुमला; खा. सुप्रिया सुळे यांची मोदी-फडणवीसांवर टीका  

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पैठण- संसदेच्या शेवटच्या सत्रात मोदी सरकारने १० टक्के आरक्षण लागू केले असून या आरक्षणाचा काय फायदा होणार हा मोदींंचा नवा जुमला आहे. आरक्षण द्यायचे असते तर चार वर्षांपूर्वी दिले असते. केवळ तीन राज्यात भाजपचा पराभव झाला त्यामुळे आरक्षणाचे गाजर दिले असून पेट्रोलचे भाव ही त्यामुळे कमी झाले. केंद्रातील व राज्यातील हे सरकार फसवणूक करत असल्याने सरकार आता सत्तेतून खाली खेचण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केले. त्या तालुक्यातील वाहेगाव, बिडकीन येथील युवक मेळाव्यात बोलत होत्या. 

 

या वेळी माजी आमदार संजय वाघचौरे, जिल्हाध्यक्ष कैलाश पाटील, छायाताई जंगले, विजय गोरे, अनिल घोडके, अप्पासाहेब निर्मळ आदींची प्रमुख उपस्थिती होती. सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान मोदींवर टीका करताना मोदी हे आपल्या काही उद्योगपती मित्रांसाठी काम करतात. तसे त्यांना पटत असेल तर करावे पण आमच्या सामान्य गरीब लोकांच्या पैशावर त्यांचे का भले करता? तुम्हाला ही जनता माफ करणार नाही. १५ लाख तर दिले नाही आमचे होते ते ही काळ्या पैशाच्या नावाखाली पैसे काढून घेत छोट्या मोदीला दिले. किती काळा पैसा आणला हे मोदी आता काही सांगत नाहीत आमचा एक शहीद झाला तर शंभर तिकडचे मुंडके आणू असे रेटून सांगणारे मोदी आता त्यावर काहीच न बोलता लोकांना किती दिवस मूर्ख बनवणार त्यांना आता जागा दाखवा असे आवाहन सुळे यांनी केले. आमचे सरकार येताच तालुक्यातील रखडलेल्या ब्रम्हगव्हाण उपसा सिंचन योजना मार्गी लावली जाईल, हेच सरकार अजित पवार यांच्यावर आरोप करते. मात्र निवडणुका झाल्या की गप्प राहते, अजित पवार यांच्यामुळे पुण्यात आजही कामे होतात.

 

पुण्यात यांचे खासदार मंत्री आहेत मात्र त्यांना काम कसे करावे हेच कळत नसल्याचा दावा सुळे यांनी केला. या वेळी माजी आमदार संजय वाघचौरे यांनी सध्याचे आमदार व खासदार हे येथील लोकांना मंत्रालयात घेऊन जातात व पैसे आणू सांगतात, असे पैसे येत असतात का? ब्रम्हगव्हाण योजनांसाठी एक रुपयाही नवीन आला नाही आमच्या काळातील राहिलेले पैसे आजही खर्च केले जात आहेत. नवीन पैसा आणा ही योजना दोन महिन्यांत पूर्ण करू असे खोटे दावे करू नका अशी टीका वाघचौरे यांनी आमदार भुमरे व खासदार दानवे यांच्यावर केली. या वेळी भाऊसाहेब तरमळे, रेवण कर्डीले, ज्योती काकडे, अनिल हजारे, विशाल वाघचौरे, विशाल थोटे,अक्षय पाटील, काका कणसे, विजय गायकवाड आदी उपस्थित होते. 

 

बातम्या आणखी आहेत...