आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजळगाव : राज्यपातळीवर भाजप-शिवसेनेेचे नेते महायुतीच्या आणाभाका घेत असताना जिल्ह्यात मात्र भाजपच्या अधिकृत बंडखाेरांनी शिवसेनेच्या उमेदवारांना जेरीस आणले आहे. सहकार राज्यमंत्री तथा शिवसेना उपनेते गुलाबराव पाटील हेदेखील या बंडखाेरीने त्रस्त आहेत. पंतप्रधान नरेंद्र माेदींच्या सभेत पालकमंत्री गिरीश महाजन समाेर येताच गुलाबरावांनी त्यांचा दंड धरून 'भाऊ ही कसली युती' असा जाब विचारला. अधिकृत बंडखाेर उभे करून पाठीत खंजीर खुपसला जात असल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या. सभेपूर्वीच उद्भवलेला वाद मिटवण्यासाठी मंत्री महाजनांनी तेथून काढता पाय घेतला. दरम्यान, गुलाबरावांनी व्यासपीठामागे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे तक्रार केली. पंतप्रधान कार्यालयाकडून देखील या प्रकाराची दखल घेण्यात आल्याचे म्हटले जाते.
पाटील म्हणाले, शिवसेनेच्या चारही मतदारसंघात उभे असलेले असंतुष्ट नेते भाजपच्या नेत्यांचे फाेटाे आणि झेंडा वापरून 'अधिकृत भाजप बंडखाेर' असल्याचा प्रचार करत आहेत. कारवाई करण्याएेवजी भाजपचे नेते त्यांना सहकार्य करत असल्याचा संशय आहे. पंतप्रधानांची सभा महायुतीसाठी असताना या सभेत केवळ भाजपची छाप आहे. कुठेही शिवसेनेचे चिन्ह नसल्याने मंत्री गुलाबराव पाटील यांनी नाराजी व्यक्त केली. माेदींच्या सभेतील सर्व माध्यमांचे लक्ष गुलाबरावांनी वेधून घेतल्याचे व्यासपीठावरून पाहताच पालकमंत्री महाजनांनी गुलाबरावांच्या शेजारी असलेल्या कार्यकर्त्याला फाेन करून गुलाबरावांशी बाेलणे केले. व्यासपीठावर यावे म्हणून विनंती केली.
बाेलण्याची संधी नाकारली
सभेत बाेलू द्यावे अशी मागणी गुलाबरावांनी केली हाेती. मात्र बंडखाेरीच्या विषयावरून मंत्री गुलाबराव सभा गाजवू शकतात ही भीती असल्याने भाजप नेत्यांनी विशेषत: पालकमंत्री गिरीश महाजनांनी गुलाबरावांएेवजी शिवसेनेकडून माजी आमदार चिमणराव पाटील यांना बाेलण्याची संधी दिली.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.