आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुमच्या व्हॉट॰सअॅप ग्रुपचे नाव काय आहे?

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या शुक्रवारी उत्तर प्रदेशच्या बरेलीच्या जिल्हा रुग्णालयात तीन वर्षांच्या मुलाला 'मन कक्ष' नावाच्या काउन्सेलिंग सेंटरमध्ये भरती केले गेले. कारण तो सतत अंथरूण ओले करत असे. हे असे होण्याचे कारण म्हणजे तो लहान मुलगा हातातील मोबाइलवरच्या आवडत्या 'डोरेमान' आणि 'मोटू-पतलू' या पात्रांचे एपिसोड चुकवण्यास अजिबात तयार नसे. असे प्रकार वाढतच आहेत. गेल्या दोन महिन्यांत ३९ प्रकार नजरेस आले असून यात मुलांना व्हिडिओ आणि गेम्सच्या दुनियेतून बाहेर यायचे नाही, या समस्येने ग्रासलेली ही मुले आहेत. केवळ तीन वर्षांचा मुलगा 'मोबाइल-अॅडिक्ट' बनतो हे पाहणे भयावह आहे. शिक्षकदिनी मध्य प्रदेशातील रतलाम येथे सादर करण्यात आलेल्या नाटकात स्वत: शिक्षकांनी कामे करून मोबाइल वेडाचे दुष्परिणाम सांगितल्यानंतर तर मला या समस्येचे गांभीर्य अधिकच जाणवले. आपल्याला तहान लागलेली आहे, पाणी आण असे पती, पत्नीला सांगतो, हा विसंवादाचा सूर या नाटकात आहे. या नाटकाचे स्क्रीप्टच ताकदवान आहे. ज्या कुटुंबात आई-वडिलांचाच संवाद नाही, अशा वातावरणात मुले कशी राहत आहेत, हा या नाटकाचा विषय आहे. यावरूनच मला पुण्याच्या प्रेरणादायी ग्रुपचे काम आठवले. त्या ग्रुपमध्ये प्रोफेशनल्स आणि निवृत्त लोक आहेत. या व्हॉट॰सग्रुपचे नाव आहे, 'बिइंग विथ यू (तुमच्यासोबत )' उपचाराची वाट पाहणाऱ्या आजारी आणि गरजू लोकांच्या मदतीसाठी हा ग्रुप काम करतो. आज काम करणाऱ्या पती-पत्नींमुळे कुटुंबाची कमाई दुप्पट जरूर झाली आहे. पण घरात किंवा रुग्णालयात कोणी आजारी असेल तर त्याकडे लक्ष देण्यास कोणाला वेळ नाही. त्यांच्या मदतीसाठी पुण्यातील स्वयंसेवी लोकांचा एक ग्रुप एकत्र आला. हे लोक कोणतीही कौशल्यपूर्ण नर्सिंग सेवा देत नाहीत, तर रुग्ण किंवा वृद्ध लोकांच्या नियमित गरजा पुरवण्यासाठी ते काम करतात. माधवी ठाकूरदेसाई, श्रीरंग पलांडे, अस्मिता पटवे, नितीन ठाकूरदेसाई आणि उपेंद्र पेंडसे या पाच जणांच्या ग्रुपने या वर्षात जूनमध्ये काम सुरू केले. या टीमशी आत्तापर्यंत ३० लोक जोडले गेले आहेत. या सर्व स्वयंसेवकांचे वय ४० ते ७० दरम्यान आहे. ते ही सेवा मोफत करतात. आत्तापर्यंत ४० गरजूंना त्यांनी सेवा दिली असून पुढच्या काळात ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. यांच्या कामाची पद्धत समजून घ्यायची झाली तर हे सर्व एका व्हॉट॰सअॅप ग्रुपच्या माध्यमातून काम करत आहेत. मदतीचा संदेश मिळाल्यानंतर ते सर्वात पहिल्यांदा हे निश्चित करतात की, या कामासाठी ग्रुपमधला कोणता स्वयंसेवक उपयुक्त ठरेल. शिवाय अशा सदस्याला संधी देतात, ज्याचे वय रुग्णाच्या बरोबरीचे असेल, जेणेकरून सुसंवाद साधण्यास अडचण येणार नाही.   व्हॉट॰सअॅपच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने समन्वय साधून सदस्य, प्रत्येक जबाबदारीचे स्वरूप जाणून घेतात. जर कोणाला जादा वेळेसाठी मदतीची गरज असेल तर सर्वजण मिळून काम वाटून घेतात. फंडा असा तुम्ही कोणत्या व्हॉट॰सअॅप ग्रुपशी जोडले गेलेले आहात, त्यावरून येणाऱ्या काळात तुमची सामाजिक प्रतिष्ठा ठरवली जाईल. जर तुमच्याकडेही 'बिइंग विथ यू' सारख्या ग्रुपचे सदस्यत्व असेल तर तो संपर्क तुम्हाला एक मोठा माणूस ठरवेल.