आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअयोध्येहून आदित्य तिवारी एक काळ होता की, यूपी पोलिस गोळीऐवजी तोंडातून ठाे-ठाे आवाज काढत गुन्हेगारांचा मुकाबला करताना दिसले होते. मात्र, अयोध्येवरील सर्वात मोठ्या निकालानंतर याच पोलिसांनी सायबर पाळतीचे सर्वात चांगले उदाहरण सादर केले. वाचा पूर्ण वृत्तांत... गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये एका चकमकीच्या वेळी पिस्तूल न चालल्याने उत्तर प्रदेश पोलिसांना तोंडाने ठाे-ठाे आवाज काढावा लागल्याने त्यांचे चांगलेच हसू झाले होते. याच्या जवळपास एक वर्षानंतर देशातील सर्वात मोठ्या आणि संवेदनशील अयोध्या निकालानंतर आता यूपी पोलिसांचे कौतुक होत आहे. याचे कारण म्हणजे या पोलिसांनी सायबर पाळत ठेवण्याचे सर्वात चांगले उदाहरण दिले आहे. अयोध्या निकालाच्या जवळपास १५-२० दिवस आधीपासूनच सायबर पोलिसांनी सोशल मीडियावर पाळत ठेवल्याने हिंसाचाराची एकही घटना घडली नाही. राज्याचे डीजीपी ओ. पी. सिंग सांगतात की, आम्ही पूर्ण उत्तर प्रदेशातील १७ संवेदनशील जिल्ह्यांत शांतता समितीच्या बैठका घेतल्या. अधिकाऱ्यांनी या निर्णयानंतर सामाजिक सलोखा बिघडू न देण्याविषयी समजावले. त्यांनी सांगितले की, या दरम्यान सामाजिक सलोखा बिघडवण्यासाठी काहीही करता येऊ नये म्हणून १० हजार लोकांवर निर्बंध लावण्यात आले. तर, कायदा व सुव्यवस्थेचे आयजी प्रवीण कुमार यांनी सांगितले की, अयोध्या निकालाबाबत आम्ही सर्व जिल्ह्यांमध्ये सोशल मीडियावर पाळत ठेवण्यासाठी सुमारे १३० पोलिस कर्मचाऱ्यांची टीम स्थापन केली होती. तसेच, पोलिस मुख्यालय व अयोध्या जिल्ह्यात दोन टीम बनवल्या होत्या. ज्या पूर्ण राज्यातून येणाऱ्या तक्रारींवर आणि त्यावरील कारवाईसाठी राबत होत्या. यात ४० पोलिस कर्मचाऱ्यांचा समावेश होता. विशेष सॉफ्टवेअरच्या मदतीने साेशल अकाउंट्सवर नजर ठेवली जात होती. > सुमारे १३० लोकांच्या टीमने यूपीतील ७५ जिल्ह्यांत १५-२० दिवस पाळत ठेवली > पोलिस मुख्यालय आणि अयोध्येत ४० लोकांच्या दोन विशेष टीम होत्या >“अयोध्या हॅशटॅग’सारख्या शब्दांवर विशेष सॉफ्टवेअरने पाळत
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.