आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'उद्धव ठाकरे यांची श्रद्धा रामावर आहे तर त्यात चुकीचे काय? राम कोणाच्या मालकीचे नाहीत'- जितेंद्र आव्हाड

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • संजय राऊतांनी उद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याची घोषणा केली

मुंबई- राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे परत एकदा अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. येत्या 7 मार्चला अयोध्येत जाणार असल्याची घोषणा शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी केली. त्यानंतर उद्धव ठाकरेंवर विरोधकांकडून टीका करण्यात आली होती. आता गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी उद्धव ठाकरेंची पाठराखण केली आहे. "राम हे कोणाच्या मालकीचे नाहीत. उद्धव ठाकरे यांची श्रद्धा रामावर आहे. तर त्यात चुकीचे काय? त्यात सरकारचा काय संबंध?" असा प्रश्नही आव्हाडांनी उपस्थित केला.

याबाबत बोलताना आव्हाड म्हणाले की, "राम ही श्रद्धा आहे. मी खंडोबा, कोलकातामधील दुर्गा मातेच्या मंदिरात जातो. तुळजापूर, नाशिकची शप्तश्रृंगीला जातो. देव हा एकच आहे. त्यामुळे ते रामाकडे गेलो तर काय फरक पडतो? राम कोणाच्या मालकीचे नाहीत. उद्धव ठाकरे यांची रामावर श्रद्धा आहे. तर त्यात चुकीचे काय? त्याच सरकारशी काय संबंध? उद्या मी जरी जायचं ठरवलं तर मला कोण अडवून शकतो? बघायला गेलो तर काही जण रामाला मानतात. दक्षिणमध्ये रावणाची पुजा होते हे श्रद्धास्थान आहे. मला वाटत नाही की त्यामध्ये राजकारण करावं. ज्यांना रामाच्या नावाने राजकारण करायचे आहे," असे मत आव्हाडांनी व्यक्त केले.