आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाइक लंपास केल्यानंतर त्याचे नेमके काय करतात चोर! चोरानेच केला खुलासा, एकदा आवश्य पाहा हे Photos

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जोधपूर - बाइकवर जाताना काही विकत घेण्यासाठी अचानक कुठेही पार्किंग केली आणि परतल्यानंतर ती बाइकच नाही असा अनुभव अनेकांना आला असेल. पोलिसांत तक्रार, कोर्ट मॅटर आणि पाठपुरावा घेऊन काहींना ती परतही मिळते. परंतु, जी बाइक कधीच सापडत नाही त्यांचे नेमके काय होते याचा खुलासा एका चोराच्या अटकेनंतर झाला आहे. राजस्थानच्या जोधपूर येथे विनोद कुमार नावाच्या एका चोरट्याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून केवळ सोने, चांदी आणि इतर मोल्यवान वस्तूंसह लाखोंचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. परंतु, बाइकचे त्याने जे काही केले ते पाहून सगळेच हैराण आहेत. 


> विनोद राजस्थानचा एक कुख्यात चोर आणि भामटा आहे. त्याने पंचायत समितीचा कर्मचारी असल्याचे सोंग धरून लोकांच्या कष्टाचे पैसे लुटले होते. यानंतर संधीचा गैरफायदा घेत एका ग्रामस्थाचे 10 तोळे सोने लुटले. पोलिसांनी त्याला या प्रकरणांमध्ये नुकतीच अटक केली. त्यामध्ये त्याने एक-दोन नव्हे, तर लूट आणि चोऱ्यांची यादीच मांडली. यात सर्वात धक्कादायक होते त्याचे बाइक कांड...

> दोन दिवसांच्या पोलिस कोठडीत असलेल्या विनोदने 14 चोरीच्या प्रकरणांची कबुली दिली आहे. यात पोलिसांना त्याच्याकडून महागडे मोबाईल देखील जप्त केले. यानंतर त्याच्या घराचा तपास करण्यासाठी पोहोचले तेव्हा घराच्या पाठीमागे 5 पोते सापडले. त्या पोत्यांमध्ये ऑटोमोबाइल पार्ट्स होते. पोलिसांनी पुन्हा कसून चौकशी केली तेव्हा त्याने ते ऑटोपार्ट्स प्रत्यक्षात बाइक्स असल्याचे सांगितले. 
> बाइक चोरल्यानंतर त्याचे कारीगर ठरलेले होते. बाइक चोरताच तो पहिला थांबा त्या गॅरेजवाल्यांकडे घ्यायचा. यात गाडीचा प्रत्येक पार्ट अगदी एकही नट किंवा बोल्ट उरणार नाही इथपर्यंत उघडले जायचे. तो एक-एक पार्ट पोत्यांमध्ये भरून भंगाराप्रमाणे तो घेऊन जायचा. तर पकडले जाण्याच्या भीतीने तो चेसिस त्या गॅरेज किंवा भंगारवाल्यांना वितळवण्यासाठी विकायचा. बाजारात प्रत्येक पार्टची तो सुटे भागांमध्ये विक्री करायचा. त्याला चोरी प्रकरणी अटक करण्याची ही दुसरी वेळ आहे.

बातम्या आणखी आहेत...