आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजच्या नेत्यांनी हनुमानाकडून काय शिकावे?

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हनुमानासारखे नेते बनणे सोपे नाही. पाश्चिमात्य देशातील मॅनेजमेंट गुरू सर्व्हंट - लीडरशिपसारखं मॉडेल शिकवतात. यावरून वाटतं की, नोकरांना नाइलाजाने काम करावं लागतं. हनुमान स्वत:ला रामाचे दास मानत होते, तरी ते नोकर नव्हते. हनुमान स्वेच्छेने रामाची सेवा करत होते. पण रामाला हनुमानाकडून कोणत्याही सेवेची अपेक्षा नव्हती. हनुमानानेही कधी कृतज्ञतेची अपेक्षा ठेवली नाही.
 
 

हनुमानाला रावणाच्या दरबारात घेऊन गेल्यावर ते शुद्ध संस्कृतमध्ये बोलू लागले. हनुमान म्हणाले की ते रामदूत आहेत. त्यामुळे रावणाने त्यांचा आदर राखला पाहिजे.. एक वानर देवांची भाषा बोलतोय, हे पाहून रावण आश्चर्यचकित झाले. त्यांना सुरुवातीला कळलं नाही की, हनुमान कोण आहेत. वेदांचा पंडित असूनदेखील रा‌‌वणाकडे इतकी बुद्धिमत्ता नव्हती की, ते हनुमानाला ओळखतील. रावणाने हनुमानाची चेष्टा केली आणि त्यांना बसण्यासाठी आसन पण दिले नाही. तेव्हा हनुमान म्हणाले, की जरी तुम्ही मला आसन दिले नाही तरी मी स्वत:चे आसन स्वत: निर्माण करू शकतो. हनुमानाने आपली शेपटी गोल फिरवली. त्याचं आसन बनवलं आणि त्यावर बसले. पण हे आसन रावणाच्या सिंहासनापेक्षा अधिक उंचीवर गेलं आणि त्या वेळी रावणाला राग आला. इतक्या लहान गोष्टींचा रावणाला राग येतो हे पाहून हनुमानाला हसू अनावर झाले. हे बघून रावण अधिक क्रोधित झाला व त्याने त्याच्या शिपायांना सांगून हनुमानाच्या शेपटीला आग लावायला सांगितली. त्यामुळे हनुमानाने आपली शेपटी इतकं-तिकडं फिरवून सर्व लंकेलाच आग लावली. ही घटना कधी-कधी मजेशीर वाटू शकते, पण यामागे एक मानवी मानसशास्त्रीय सत्य दडलं आहे. 
 
 
आपल्या आयुष्यात अनेक वेळा असे लोक आपल्याला भेटतात, जे शक्तिशाली असतात, ज्ञानीही असतात पण बुद्धिमान नसतात. ते खूप धनवान असतात, पण त्यांचा ‘इगो’ खूप मोठा असतो. ते सतत त्याला जपण्याचा प्रयत्न करतात. हे लोक जितके शक्तिशाली असतात तेवढीच सगळी संपत्ती गमावण्याची सतत 
भीती त्यांना वाटत असते. रावणासारखे लोक हे ज्ञानी असतात पण बुद्धिमान नसतात. शक्तिशाली असतात पण सतत चिंतेत असतात. हनुमानासारखे लोक बुद्धिमान आणि शक्तिशाली दोन्ही असतात.
 
 

जेव्हा आपण कुणालाही भेटतो तेव्हा हे ओळखणे गरजेचे आहे की, ती व्यक्ती हनुमानासारखी आहे की रावणासारखी...हे लोक आपल्याला घाबरवतात की स्वत:ला शक्तिशाली बनविण्याचा प्रयत्न करतात. रावणासारखी व्यक्ती आपल्याला घाबरविण्याचा प्रयत्न करेल, तुच्छ लेखेल. हनुमानासारखी व्यक्ती आपल्याला शक्तिशाली बनवेल. पौराणिक कथेतील पात्र आपल्याला आयुष्य समजण्यासाठी मदत करतात. रावणाला मोठे ग्लॅमर मिळाले होता. तो विद्वानही होता. वेद, स्थापत्य, संगीत आणि ज्योतिषशास्त्रात निपुण होता. पण उदार, दयाळू, विनम्र कधीच नव्हता. इतकं सगळं असूनदेखील तो बुद्धिमान कधीच बनू शकला नाही. तो गर्विष्ठ होता. रावणात कोणताही कारुण्यभाव नव्हता. त्याला कुणाची काळजी नव्हती, लंकेचीही. त्याचा समज होता की, लंका ही तिच्या सेवेसाठी आहे.
 
आजच्या काळात आपले नेतेदेखील रा‌वणासारखे वागताना आपल्याला दिसतात. सत्तेला ते आपला जन्मसिद्ध अधिकार समजतात. आपली सत्ता ही दुसऱ्यांवर अधिकार गाजवण्याचा मार्ग समजतात. उदाहरणार्थ रा‌वणाने कैलाश पर्वत उचलून नेण्याचा प्रयत्न केला होता. तो अपयशी ठरला. रावण हा शिवावर अधिकार प्राप्त करण्याचा प्रयत्न करत होता, पण शिवालाच कुणावर अधिकार गाजवायचा नाहीये. रा‌वण हा शंकराचा भक्त होता. त्यांची खूप पूजा करत होता. पण शंकरापेक्षा रावण खूप वेगळा होता. लोकपरंपरांना पाहिलं तर रावणाला शिकवण देण्यासाठी शंकराने हनुमानाचे रूप धारण केले.
 
 
हनुमानासारखे नेते बनणे सोपे नाही. पाश्चिमात्य देशातील मॅनेजमेंट गुरू सर्व्हंट - लीडरशिपसारखं मॉडेल शिकवतात. यावरून वाटत की, नोकरांना नाइलाजाने काम करावं लागतं. हनुमान स्वत:ला रामाचे दास मानत होते, तरी ते नोकर नव्हते. हनुमान स्वेच्छेने रामाची सेवा करत होते. पण रामाला हनुमानाकडून कोणत्याही सेवेची अपेक्षा नव्हती. हनुमानाने ही कधीच रामाकडून कोणत्याही कृतज्ञतेची अपेक्षा ठेवली नाही. हनुमानाने उदार मनाने रामाची सेवा केली. या गोष्टींना आध्यात्मिक म्हणून त्याकडे दुर्लक्ष केले जाते. पण कोणत्याही नेत्याने चांगला माणूस होण्यासाठी या गोष्टी समजून घेणे गरजेचे आहे.

बातम्या आणखी आहेत...