आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिस चेकिंग करत असताना करू नका त्यांना टच, शिवाय देउ नका कोणतेही स्टेटमेंट्स...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

युटिलिटी डेस्क - पोलिसांनी अचानक गाडी अडवल्यास किंवा चौकशीसाठी बोलावल्यास बरेच लोक घाबरतात. त्यांना काय बोलावे किंवा काय करावे काहीच सूचत नाही. काही जण पोलिसांपासून वाचण्याचा प्रयत्न करतात आणि दुरूनच पळ काढतात. तर काही असेही आहेत जे ओळखी दाखवण्यासाठी लोकांना फोन लावत बसतात. पोलिस आपल्याला अडवतात ते आपल्याच सेफ्टीसाठी. त्यामुळे, अशा परिस्थितीत घाबरण्याचे कारणच नाही. मग, पोलिसांनीशी नेमके कसे बोलावे असा प्रश्न निर्माण होतो. आम्ही आपल्याला अशा काही टिप्स देणार आहोत ज्या अशा परिस्थितीत पोलिसांशी बोलण्यात आणि परिस्थिती हाताळण्यात आपल्या कामी येतील.

 

- पोलिसांशी आपण कसे बोलता यावरच खूप काही ठरवले जाते. तुम्ही जे काही बोलत आहात त्याचा वापर पोलिस तुमच्याच विरोधात करून अटक करू शकतात. पोलिसांशी हुज्जत घातल्यास असे होऊ शकते. 

- पोलिसांनी आपली गाडी अडवल्यास सर्वप्रथम वाहन परवाना आणि रेजिस्ट्रेशन कार्ड दाखवावा. यानंतर पोलिस आपल्याला नाव विचारू शकतात. यावेळी आपण हुज्जत घातल्यास अटकही होऊ शकते. 

- पोलिस आपले घर किंवा कार सर्च करत असतील तर आपण त्यांना रोखू शकतात. त्यांना कोर्टाकडून मिळालेल्या सर्च वॉरंटची विचारणा करता येईल. त्यांच्याकडे सर्च वॉरंट नसल्यास आणि चेकिंग केल्यास कोर्टात आपलेच नुकसान होऊ शकते.


नेहमीच लक्षात ठेवा या गोष्टी...
- बोलण्यापूर्वी एकदा विचार करा आणि आपल्या शरीराच्या हालचालींसह भावनांवर ताबा ठेवा.
- पोलिसांशी वाद घालण्यापासून दूरच राहा. परिस्थिती आपल्या विरोधात जाईल असे काहीही करू नका.
- पोलिस आपली चेकिंग करत असल्यास हात वर करून पूर्ण सहकार्य करा. कधीही पळून जाण्याचा प्रयत्न करू नका. पोलिस अधिकाऱ्याला टच करू नये.
- आपल्याला वाटत असेल की आपण निर्दोष आहात तरीही पहिल्या टप्प्यात कधीही पोलिसांना विरोध करू नका. त्यांच्याकडे तक्रारीही करू नका. घटनेबाबत कुठलेही स्टेटमेंट करणे टाळा.
- अटक झाल्यास सर्वप्रथम आपल्या वकिलाला फोन लावा. अटक करणाऱ्या अधिकाऱ्याचे बॅज नंबर आणि पोलिस वाहन क्रमांक नोंद करून ठेवा.
- कुणी पीडित असल्यास त्यांचे नाव आणि फोन नंबर घ्या. आपण जखमी झाल्यास त्याचे फोटो काढून ठेवा. 
- आपल्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आल्यास पोलिस विभागात त्यासंदर्भात अधिकृत तक्रार दाखल करा.

बातम्या आणखी आहेत...