आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेल्वेत तिकीट, पैसे नसतील तरी प्रवाशांना बोट सुद्धा लावू शकत नाही TTE; खुद्द रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले हे नियम, वाचा काय करू शकता

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूज डेस्क - बिलासपूरच्या एका युवकाने एका टीसीवर धावत्या ट्रेनमधून ढकलून दिल्याचे आरोप लावले आहेत. तो विना आरक्षण प्रवास करत होता. सध्या गंभीर जखमी असलेल्याया युवकाचा पाय कापावा लागला आहे. ही घटना नवतनवा एक्सप्रेसमध्ये घडली असे त्याचे आरोप आहेत. युवकाने सांगितल्याप्रमाणे, त्याने रीवा एक्सप्रेसच्या जनरल डब्यात प्रवास करण्यासाठी जनरल तिकीट काढले होते. परंतु, तो नवतनवा एक्सप्रेसच्या रिझर्वेशन डब्यात चढला. तिकीट निरीक्षकाने विचारणा केली तेव्हा त्याने जनरल तिकीट दाखवले.


आधी लावला 800 रुपयांचा दंड, मग...
युवकाने लावलेल्या आरोपानुसार, तिकीट निरीक्षकाने यावर त्याच्या विरोधात 800 रुपयांचा दंड लावला. परंतु, युवकाकडे फक्त 200 रुपये होते. यानंतर टीटीईने तुरुंगात पाठवण्याची धमकी दिली. तेव्हा दोघांमध्ये वाद झाला. युवकाने आरोप लावला की टीटीईने वेंकट नगर येथे धावत्या ट्रेनमधून त्याला धक्का दिला. यात गंभीर जखमी झाल्यानंतर त्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यासंदर्भात आम्ही चीफ पब्लिक रिलेशन ऑफिसर (CPRO) दीपक कुमार आणि रेल्वे पीआरओ (इंदूर) जितेंद्र कुमार जयंत यांच्याशी बातचीत केली. अशा परिस्थितीत टीटीईने कारवाईची धमकी दिल्यास प्रवाशाने काय करावे याबद्दल जाणून घेतले. 


तिकट नाही, पैसेही नाहीत अशात काय करू शकतात प्रवासी?
- सीपीआरओंनी सांगितल्याप्रमाणे, एखाद्या प्रवाशाने जनरल तिकीट घेऊन रिझर्वेशनच्या डब्यात प्रवास केल्यास त्याच्या विरोधात चालान फाडण्याचा अधिकार टीटीईला आहे. 
- अशात प्रवाशाकडे पैसे नसतील तर त्याला जवळच्याच एखाद्या स्टेशनवर (जेथे ट्रेन थांबणार असेल) उतरता येते. 
- टीटीईकडे सीट उपलब्ध असल्यास तो संबंधित प्रवाशाला जनरल तिकीट आणि रिझर्वेशन यांच्यातील फरकाची रक्कम घेऊन आरक्षित तिकीट ट्रेनमध्येच बनवू शकतो.
- अशा परिस्थितीत एखादा प्रवासी टीटीईसोबत असभ्य वर्तन करत असेल तर तो त्याची तक्रार जीआरपीकडे करू शकतो. जीआरपी त्या प्रवाशाच्या विरोधात कायदेशीर कारवाई करू शकतात. परंतु, कुठल्याही परिस्थितीत तो प्रवाशाला धक्का देऊ शकत नाही.
- आरक्षित श्रेणीत सीट रिकामी असल्यास फरकाची रक्कम देऊन प्रवाशी ती सीट मिळवू शकतो.  
- एखाद्या प्रवाशाने आरक्षित तिकीट काढला होता. परंतु, तिकीट हरवल्यास किंवा त्याच्याकडे ई-तिकीट सुद्धा उपलब्ध नसल्यास त्याला आपल्या जागेवर प्रवास करण्याचा अधिकार आहे. यासाठी प्रवाशाला आपला ओरिजिनल आणि वैध ओळखपत्र दाखवावा लागेल. 


टीटीईने गैरवर्तन केल्यास काय कराल?
त्या प्रवाशाकडे तिकीट असो किंवा नसो, दंड भरण्यासाठी पैसे असो किंवा नसो, कुठल्याही परिस्थितीत टीटीई प्रवाशांना हातही लाहू शकत नाही. ट्रेनमध्ये आपल्यासोबत टीटीईने गैरवर्तन किंवा असभ्य वागणूक दिल्यास आपण याची तक्रार गार्डकडे उपलब्ध असलेल्या रेजिस्टरमध्ये करू शकता. प्रत्येक टीटीईच्या युनिफॉर्मवर नाव दिलेले असते. प्रवाशी त्या टीटीईचे नाव त्या रेजिस्टरमध्ये लिहू शकतो. सध्या प्रवाशांना अशा प्रकारच्या तक्रारी देण्यासाठी ऑनलाइन अॅप सुद्धा आहेत. ते प्रत्यक्ष जीआरपीमध्ये जाऊन सुद्धा तक्रार देऊ शकतात. सोबतच, त्या अधिकाऱ्यावर नेमकी कोणती कारवाई झाली, किंवा सुनावणीत काय झाले याची माहिती सुद्धा आपल्याला घरबसल्या मिळत राहील. 

 

बातम्या आणखी आहेत...