Religion / मंदिरात देवाला वाहिलेले हार-फूल मिळाले तर त्याचे काय करावे? ग्रंथांमध्ये सांगितले आहे याचे उत्तर

मंदिरात मिळालेल्या हार-फूलांना निर्माल्य म्हणतात, यांचे एक विशेष महत्व असते
 

दिव्य मराठी वेब टीम

May 01,2019 04:16:00 PM IST


जीवन मंत्र डेस्क - मंदिरात गेलेल्या लोकांना तेथील पुजारी प्रसादासोबत देवावर चढवलेले फूल देतात. देवाचा आशीर्वाद म्हणून लोक ते फूलं घरी आणतात. पण ते फुलं आणि हार सुकल्यानंतर त्याचे काय करावे याबाबत चिंता होत असते. काहीतरी अशुभ घडण्याच्या भीतीपोटी लोक ते फुलं आणि हार फेकुन देत नाहीत. आपल्या शास्त्रांमध्ये याचे समाधान दिले आहे. उज्जैनचे पंडित आर.एस. पंड्या यांच्या मते, देवावर चढवलेले फुलं आणि हार यांना दोन-तीन प्रकारे ठेवता येते.


घरात ठेवण्यासाठी किंवा विसर्जित करण्यासाठी ग्रंथांमध्य सांगितले आहे विविध मार्ग

पं. पंड्यानुसार, मंदिरात मिळालेले फुलं आणि हार सर्वप्रथम दागिने आणि कपडे ठेवत असलेल्या घरातील कपाटात ठेवावे. प्रसादात जर फुलं मिळून दिले असेल तर ते तिजोरीत ठेवावे. फुलं सुकल्यानंतर घाबरू नका, त्यांना एखाद्या लहान पिशवी, कपडे किंवा कागदात बांधून ठेवा.


तुम्हाला जर प्रवासादरम्यान एखाद्या मंदिरातून फुलं किंवा हार मिळत असतील तर त्यावेळी ते सांभाळून ठेवणे कठीण होते. अशावेळी तुम्ही ते फुलं आपल्या तळ हातावर ठेवून त्यांचा सुगंध घ्या आणि त्यानंतर एखाद्या झाडाच्या मुळाशी ठेवा किंवा एखादी नदी, सरोवर इत्यादीमध्ये विसर्जित करा. सुंगध घेतल्यामुळे फुलातील सकारात्मक ऊर्जा तुमच्यात सामावून घेतात. यानंतर फुलं आपल्याकडे ठेवण्याची आवश्यकता नसते. अशाप्रकारे प्रवासादरम्यान मंदिरातून मिळालेले फुलं-हार इत्यादी सांभाळून ठेवण्याची आवश्यकता राहत नाही.

X
COMMENT