आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • What To Invest In Future? 3 New Options For Investing In Shares, Budget News And Updates

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भविष्यातील प्रश्न; गुंतवणुकीसाठी काय? शेअर्समधील गुंतवणुकीसाठी 3 नवीन पर्याय

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • शेअर बाजार/म्युच्युअल फंड : लाभांश वितरण कर संपुष्टात

नवी दिल्ली- अर्थसंकल्पात या वेळी गुंतवणूकदारांसाठी कमी उपाययाेजना केल्या अाहेत. परंतु अायडीबीअाय, एलअायसी व पाेर्ट कंपन्यांमध्ये गुंतवणुकीसाठी तीन पर्याय मिळतील. परंतु सरकारचा सध्या भर खर्च करण्यावर अाहे, जेणेकरून बाजारात गुंतवणूक येऊन मंदीची धारणा कमी हाेईल. या अार्थिक वर्षात सरकारने २.११ लाख काेटी रुपये निर्गुंतवणुकीचे लक्ष्य ठेवले अाहे.शेअर बाजार/म्युच्युअल फंड : लाभांश वितरण कर संपुष्टात

घोषणा : शेअर बाजारातील लाभांश वितरण कर संपुष्टात अाणला अाहे. अल्प कालावधीच्या भांडवली मिळकतीत बदल केलेला नाही. ताे अाता  15 टक्के अाहे. 


सरकार अायपीअाेद्वारे एलअायसीतील हिस्सा विकेल 


सरकार अायडीबीअायमधील अापला हिस्सा खासगी क्षेत्राला देईल.


बंदर व्यवसायाशी निगडित कंपन्यांचे लिस्टिंग हाेईल.  


नवीन कर स्लॅब निवडल्यानंतर ए इक्विटी लिंक टॅक्स सेव्हिंग स्किम, एलआयसीचा फायदा  मिळणार नाही. 


नवीन कर स्लॅबमध्यही नॅशनल पेन्शन  याेजना कायम राहिल्याने गुंतवणूक वाढेल.

परिणाम : लाभांश वितरण कर संपल्याने सामान्य गुंतवणूकदारांवर अार्थिक भार अाला असून  ते कराच्या कक्षेत येतील. कंपन्यांच्या एेवजी अाता त्यांना कर द्यावा लागेल. एलअायसी, अायडीबीअाय व बंदराशी निगडित नफा देणाऱ्या कंपन्यांचे शेअर्स खरेदी करून गुंतवणूकदार अापल्या फाेर्टफाेलिअाेतील नफा वाढवू शकतात.  नवीन कर स्लॅब निवडणाऱ्यांची शेअर बाजारातील भागीदारी कमी हाेईल. म्युच्युअल फंडातील भागीदारी कमी हाेईल.जुन्या स्लॅबमध्ये राहणारे करदाते गुंतवणुकीकडे अाकर्षित हाेतील.  दीर्घकाळात त्यांना नफा हाेऊ शकताे.

रिअल इस्टेट : स्वस्त घरांकडे कल

घोषणा : रिअल इस्टेटसाठी अर्थसंकल्पात दाेन महत्त्वाच्या घाेषणा झाल्या अाहेत. परवडणारी घरे याेजनेचा मार्च २०२१ पर्यंत विस्तार. बिल्डरांना प्राप्तिकरात मिळणाऱ्या सवलतीत वाढ केली .

परिणाम : परवडणाऱ्या घर याेजनेचा कालावधी वाढवल्याने लाेकांचा स्वस्त घरांकडे कल वाढेल. बिल्डर्सची परवडणारे प्रकल्प सुरू करण्याची डेडलाइन वाढू शकेल. 

सोने : आयातीला लगाम घालण्याचा प्रयत्न

घोषणा : साॅव्हरिन बाँडवरील व्याजदर वाढण्याची व गाेल्ड माॅनेटायझेशन नवीन स्वरूपात येण्याची अपेक्षा हाेती. पण असे झाले नाही. साेने अायातीला लगाम घालण्यासाठी तरतूद केली अाहे.

परिणाम : सॉव्हरिन गोल्ड बांॅडचे अाकर्षण कमी हाेईल. माॅनिटायझेशन याेजना न अाल्याने घरातीलसाेने बंॅकेपर्यंत जाऊ शकणार नाही. अायातीला लगाम घातल्याने विदेशी चलन वाचेल.
एफडी/बाँड : कॉर्पोरेट बाँड गुंतवणूक मर्यादेत वाढ

घोषणा : एफडीमध्ये सुरक्षा विमा मर्यादा 1  लाखांवरून वाढवून 5  लाख केली. काॅर्पाेरेट बाँडमधील विदेशी गुंतवणूक मर्यादा ९ % वरून १५ % वाढवली. निवडक सरकारी राेख्यांमधील एनअारअायच्या गुंतवणूक मर्यादेत वाढ केली. लिक्विड बांॅड,सरकारी राेख्यांना डीडीटी लागणार नाही.

परिणाम: गरीब व मध्यमवर्गाची एफडीतील गुंतवणूक वाढेल. काॅर्पाेरेट बांॅडमध्ये विदेशी गुंतवणूक मर्यादा वाढल्याने  कंपन्यांना  कमी व्याजाने दीर्घकाळ रक्कम मिळेल. एनअारअाय गुंतवणूक वाढेल.

विमा : मेडिक्लेमची मागणी वाढेल

घोषणा: नवीन कर स्लॅबमध्ये विमा पाॅलिसीची सवलत संपली.अायुष्मान भारतची कक्षाही घटली.
परिणाम : विमा पाॅलिसीची विक्री घटेल.अायुष्मानची कक्षा न रुंदावल्याने मेडिक्लेम पाॅलिसी विक्री वाढेल. लाेक नवीन पाॅलिसी सुरक्षेसाठी खरेदी करतील.