आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेसचे भविष्य काय असू शकते हे नऊ प्रश्नांतून जाणा; राहुल गांधी यांचा राजीनामा व नव्या अध्यक्षाबाबत विश्लेषण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लोकसभा निवडणुकीच्या ४० दिवसांनंतर अखेर राहुल गांधी काँग्रेसच्या अध्यक्षपदी असणार नाहीत हे निश्चित झाले. त्यांनी पक्षाध्यक्ष निवडण्यास सांगितले आहे. या आठवड्यात होणाऱ्या काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत नव्या अध्यक्षाबाबत निर्णय घेतला जाईल, असे मानले जात आहे. म्हणजे, आगामी अध्यक्ष कसा असेल, यावर सध्या संभ्रम आहे. यासोबत राहुल यांच्या राजीनाम्यामागची कारणे, पक्षाची स्थिती व राहुल गांधींच्या भवितव्याचीही चर्चा होत आहे.‘दिव्य मराठी'साठी तीन तज्ज्ञांनी या स्थितीचे विश्लेषण केले.

 

1. राहुल गांधींच्या  राजीनाम्यानंतर पक्षाची दिशा व स्थिती काय होऊ शकते ?
> ज्येष्ठ पत्रकार व ‘सोनिया, अ बायोग्राफी’ पुस्तकाचे  लेखक रशीद किडवई म्हणाले की, राहुल यांच्या निर्णयामुळे काँग्रेसला बळ मिळेल. आतापर्यंत नेहरू-गांधी कुटुंबातील नेत्याने उचललेले मुद्दे जनता नाकारत होती. मोदींनी जी नामदार-कामदाराची व्याख्या सांगितली होती त्याची लोकांवर जास्त छाप पडली होती. राहुलनी विवेकाचा वापर करत राजीनामा दिला. राहुल गांधी लीडर अॅट लार्ज तर राहणारच. यूपी-बिहारच्या प्रादेशिक पक्षांच्या पतनानंतर राष्ट्रीय पक्षासाठी संधी आहे. लोकांचा भाजपकडून अपेक्षाभंग होत असेल तर काँग्रेस पर्याय म्हणून सादर करू शकते. ज्येष्ठ पत्रकार विनोद शर्मा म्हणाले, राहुलनी दिखावा न करता राजीनामा दिला. आता घराणेशाहीच्या आरोपाला लगाम लागेल.


ज्येष्ठ पत्रकार एन.के. सिंह याच्या मागची कारणे व कमतरतेवर प्रकाश टाकतात. ते म्हणाले, गुजरातमध्ये चांगल्या कामगिरीनंतर राहुल गांधी हे अमित शहांप्रमाणे जिल्ह्या-जिल्ह्यात पक्ष आराखडा तयार करण्यासाठी बाहेर पडले असते तर बरे झाले असते. गुजरातमध्ये ते का जिंकले आणि आता का हरले हे ते समजू शकले नाहीत. त्यांनी केडर तयार करणे, लोकांना जोडण्याचे तळागाळात जाऊन काम केले असते तर कदाचित अशी वेळ आली नसती. त्यांनी कधी आराखडा तयारच केला नाही.


2. राहुल यांच्या निर्णयाकडे पलायनाच्या दृष्टीने पाहिले जाऊ नये का ?
> रशीद यांच्यानुसार पी.व्ही. नरसिंह राव जेव्हा १९९६ ची निवडणूक हरले होते किंवा सीताराम केसरी काँग्रेस अध्यक्ष असताना १९९८ च्या निवडणुकीत सक्रिय झाले नव्हते तेव्हा पक्षात त्यांना विरोध झाला आणि राजीनाम्याची मागणी झाली. मात्र, राहुलना असा विरोध नाही. कारण, त्यांनी या स्थितीतून स्वत:ला बाहेर काढले आहे. त्यामुळे याला पलायन म्हटले जाऊ शकत नाही. एन.के. सिंह यांचे याबाबतीत वेगळे मत आहे. हा १२ कोटी मतदारांसोबत धोका आहे,ज्यांनी जुन्या काँग्रेस व नेहरू-काँग्रेस कुटुंबाला मत दिले. सांभाळू शकत नसाल तर तुमचे प्रयत्न काय आहेत. किती तरी मुद्दे उचलता आले असते, तुम्ही फक्त मोदी चाेर आहे एवढेच म्हणत बसलात.


3. यामुळे काँग्रेस तात्कालिक रूपात संकटात अडकली तर नाही ना ?
> रशीद म्हणाले, काँग्रेस संकटापासून दूर गेली आहे. ४० दिवस झाले ना कोणते सरकार कोसळले, ना बंडखोरी झाली, ना मोठा नेता पक्षाबाहेर गेला. राहुलना हटवण्याची मागणी झाली नाही. मला वाटते सर्व सामान्य आहे. आता दोष कुणाला द्यायचा ही भाजपसाठी समस्या झाली आहे.


िवनोद शर्मा म्हणाले, १३४ वर्षांचा पक्ष असा छू मंतर होत नाही. १९८४ च्या निवडणुकीनंतर भाजप गायब झाली होती. तो १२ कोटी मते घेणारा पक्ष आहे. मेलेला हत्तीही सव्वा लाखाचा असतो. लोकशाहीत विरोधी पक्षाची गरज आहे. काँग्रेसमुक्त भारत घोषणा लोकशाहीविरोधी आहे.


एन.के. सिंह कार्यकर्त्यांच्या संकटाचा पुनरुच्चार करतात. ते म्हणाले, काँग्रेसला आपली विचारसरणी निश्चित करण्यात अडचणी येत आहेत. एक वेळ धर्मनिरपेक्षतेला विचारसरणी सांगितले, मात्र ते धर्मनिरपेक्षता कमी मुस्लिम तुष्टीकरण जास्त होते. २०१४ मध्ये मनरेगा व सर्व शिक्षा अभियानासारखा अद्भुत कार्यक्रम असतानाही काँग्रेस का हरली होती? कारण पक्ष आणि जनतेत संपर्क नव्हता. हे काम पक्षाचे कार्यकर्ते करत असतात.

 

4. राहुल गांधी पक्षाध्यक्षपदी राहणार नसतील तर आता ते काय करतील?
> विनोद शर्मा यांच्या म्हणण्यानुसार, राहुल गांधींनी जनतेसोबत जोडले पाहिजे. दैनंदिन कामातून ते मुक्त होतील व भारत यात्रा करू शकतील. लोकांच्या काय अपेक्षा आहेत,अशी विचारणा त्यांना करू शकतील. काँग्रेसमध्ये नव्या रक्ताची गरज आहे. त्यांना नवे कार्यकर्ते, नव्या विचाराची गरज आहे.


रशीद यांना वाटते की, भाजपमध्ये अटलबिहारी वाजपेयी व लालकृष्ण अडवाणी यांच्यासारखे तगडे नेते होते. ते पक्षाध्यक्ष नव्हते, मात्र त्यांचा प्रभाव राहिला. याच प्रमाणे जय प्रकाश नारायण यांनी जनता पार्टीत काेणतेही पद घेतले नाही, मात्र त्यांचा नैतिक दबदबा होता. राजकीय पक्षांमध्ये असेही नेते असतात जे पदाशिवाय महत्त्वाच्या भूमिकेत राहतात. एन.के.सिंह म्हणाले, राहुल दैनंदिन कामात सहभागी होतील,असे वाटत नाही. 


5. भविष्यात  राहुल यांच्या पंतप्रधानपदाच्या दावेदारीवर परिणाम होईल?
> काँग्रसशी संबंधित दोन पुस्तकांचे लेखक रशीद म्हणाले, काँग्रेसचा दोर जळाला आहे. पंतप्रधान होणे आता नंतरची गोष्ट आहे. प्रथम हरियाणा, महाराष्ट्र,झारखंड व नंतर उत्तर  प्रदेशची विधानसभा  हे मोठे टप्पे असतील. यावर राहुल यांना लक्ष दिले पाहिजे. तसे पाहता, गांधी कुटुंब कधी सत्तालोलुप राहिले नाही. १९९१ पासून आतापर्यंत संधी असताना त्यांचा कोणी पंतप्रधान झालेला नाही. सक्रिय राहू, परंतु नेतृत्व स्वीकारणार नाही,असे मॉडेल पक्षात आणत आहेत. उदा. सोनिया गांधींनी केले तसे. टीकाकारांनी पॉवर विदाऊट रिस्पॉन्सिबिलिटी मॉडेल म्हटले आहे.


विनाेद शर्मा यांच्या मते, सध्या पक्ष वाचवण्याची  आवश्यकता आहे. चालणे-फिरणे नव्याने शिकायचे आहे. सध्या राज्यांची तयारी करा. यामुळे लोकांना पर्याय उपलब्ध होईल.


6. नवीन अध्यक्ष गांधी कुटुंबाच्या प्रभावाखाली की बाहेर जाऊन काम करेल?
> नवीन अध्यक्ष केडर बनू शकताे की नाही यावर हे अवलंबून आहे. जाे काेणी हाेईल त्याला लाेक स्वीकारतील का हेही बघितले पाहिजे असे  एन.के. सिंह मानतात.रशीद काँग्रेसच्या जुन्या दिवसांचे उदाहरण देतात. ते म्हणतात, पी.व्ही. नरसिंह राव पंतप्रधान असताना साेनिया गांधी राजकारणातही आल्या नव्हत्या. तरी राव त्यांना दर १५ दिवसांनी भेटायला जायचे आणि पक्षाशी संबंधित निर्णयांवर चर्चा करायचे. इंदिरा गांधींच्या काळातही अनेक बिगर गांधी अध्यक्ष झाले. जर काेणी परिपक्व व्यक्ती  असेल तर राहुल आणि नवीन अध्यक्षांमध्ये सहसंबंध हाेऊ शकतात. विनोद शर्मा म्हणतात, प्रश्न निर्माण हाेतच राहील. सत्ता वास्तविक  असते फाॅर्मल नाही.पदामुळे व्यक्तीला महत्व मिळत नाही. काँग्रेस पक्षात गांधी - नेहरू कुटुंबाचे महत्त्व नेहमी राहील. लाेक म्हणतील रिमाेट कंट्राेल आहे. परंतु हे सहन करावे लागेल. राहुल अध्यक्ष ठरवेल पण कठपुतळी म्हणणे चुकीचे ठरेल.

 

7. नवीन अध्यक्ष आल्यास काॅंग्रेस भक्कम हाेईल की आणखी त्याची वाताहात हाेईल ?
> ज्येष्ठ पत्रकार एन.के. सिंह म्हणतात, नेहरू- गांधी कुटुंब नसेल तर काॅंग्रेसची वाताहात हाेऊ शकते. पण माेदी चुकीचे असल्याचे मानणारा बुध्दिजीवींचा माेठा नाही पण एक लहानसा गट आहे. केवळ  हिंदुत्वाने आपले भले हाेणार नाही हे जनतेला सांगावे लागेल पण ते सांगण्यासाठी कॅडर पाहीजे. माेदी चाेर आहे असे म्हणून चालणार नाही. भाजपला कधीही काॅंग्रेसपेक्षा जास्त मते मिळाली नाहीत हे २०१४च्या आधीचा इतिहास सांगताे. उलट १९९८ नंतर भाजपची मते सतत कमी हाेत गेली. काॅंग्रेसकडे क्षमता आहे. कालाैघाने माेदीची जादू आेसरेल. पक्षाची वाताहात झाले, लाेक संपली असे देशाच्या इितहासात घडले आहे. तर काॅंग्रेसची वाताहात हाेण्याची शक्यता असेल ? मार्क्सवादी खूप वैचारिक असूनही ते संपले. विचारधारा नसेल तर काॅंग्रेसला काेण विचारेल? परंतु इितहासात कांॅग्रेसलाही कधी २८ टक्क्यांपेक्षा कमी मते मिळाली नाहीत तर मग त्यांना आपण नजरेआड करू शकत नाही. कॅडर रचना सशक्त करा,अध्यक्षांना आपले व्यक्तीमत्व द्या. वापसी शक्य असेल तर वाताहातही शक्य आहे. रशीद म्हणाले, गाेरखपूरपासून मुंबईपर्यंत पाहिल्यास जेथे काॅंग्रेसने एकही जागा जिंकली नाही असे दिसणार नाही यापेक्षा आणखी वाईट स्थिती काय असू शकते. कमीत कमी १०० जागा पार केल्या तर राष्ट्रीय पक्ष आहे असे वाटेल. नंतरही भक्कम किंवा वाताहात हाेण्याची चर्चा हाेईल.
 

 


8. जुने काँग्रेसी (उदाहरणार्थ शरद पवार) परत येऊ शकतात का? 
> रशीद म्हणतात एका दृष्टिकाेनातून या सर्व गाेष्टी सैद्धांतिक आणि चांगल्या वाटतात व वाटलेही पाहिजे. पण हे केवळ राजकीय विलीनीकरण हाेणार की एनसीपीची साधनेही काँग्रेसमध्ये येणार का बघितले पाहिजे. विनाेद शर्मांच्या मते नवीन अध्यक्ष काेणीही हाेवाे, पण पक्षहिताचा विचार करणाऱ्या जुन्या काँग्रेसींनीच  पक्षात यावे, असा  संदेश काँग्रेसकडून दिला गेला पाहिजे.  या काळात काेण स्वत:ला काँग्रेसमध्ये विलीन करून घेईल, असा प्रश्न एन. के. सिंह उपस्थित करतात. हाे पण, शरद पवार अध्यक्ष झाले तर ते पक्षाला आकार देतील. ते चांगला पर्याय ठरू शकतात. यामुळे काँग्रेस गांधी कुटुंबाच्या हातून जाईल. कारण तिकीट काेणाला देऊ हे विचारायला पवार १० जनपथकडे जाणार नाहीत. पवारांचा किती जण स्वीकार करतील हेही बघितले पाहीजे.  


9. राहुल अध्यक्षपदावरून गेले तर प्रियंका गांधींचा मार्ग माेकळा हाेत आहे का ?
> रशीद यांच्या मते निवडणूक प्रचारात प्रियंका राहुलच्या छत्रछायेत राहिली. पुलवामा, बालाकाेटनंतर त्या राजकीय काैशल्य दाखवू शकल्या नाहीत, असे अनेक काँग्रेसी मानतात. राहुल काँग्रेसचे अध्यक्ष नसतील तर २०२२ च्या निवडणुकांसाठी उत्तर प्रदेश, बिहारसारख्या राज्यात कदाचित पकड मिळवू शकताे व ते काँग्रेससाठी खूप गरजेचे आहे. प्रियंका अध्यक्ष बनण्याची शक्यता कमी आहे. विनाेद शर्मा म्हणाले, प्रियंका अध्यक्षपदाच्या खालचे एखादे पद घेतात का  किंवा नवीन अध्यक्ष त्यांना काेणते काम देतात की नाही हे पाहावे लागेल. एन.के. सिंह म्हणाले, खुद्द राहुलच त्यांना अध्यक्ष करण्याचा प्रस्ताव ठेवू शकतात. अन्यथा प्रियंका स्वत: पुढे येण्याची शक्यता नाही. पक्षाला प्राेत्साहन देण्याची त्यांची क्षमता आहे, असे मला वाटते. वढेरा प्रकरणात भाजप त्यांना जरूर अडचणीत आणू शकते, पण वढेरा यांना तुरुंगवास झाला तर प्रियंकाला सहानुभूती मिळू शकते. लाेक त्यांचा स्वीकार करू शकतील. प्रियंकापेक्षा चांगला पर्याय हाेऊ शकणार नाही. सुदैवाने अशी मागणी काेणी करत नाहीये.
 

 

राहुल यांचे करिअर

> सरचिटणीस (मार्च 2004-मार्च 2015)
२००४ मध्ये अमेठीतून विजय. २००७ मध्ये सरचिटणीस. एनएसयूआय उभारण्याचा प्रयत्न. २०१२ मध्ये यूपी निवडणुकीत नेतृत्व. ४०३ जागांपैकी केवळ २७ जागा जिंकल्या.


> उपाध्यक्ष (जानेवारी 2013-डिसेंबर 2017)
2014 च्या निवडणुकीत पक्षाला ४४ जागा मिळाल्या. राहुलनी या काळात काँग्रेसची १२ राज्यांत सत्ता गमावली. मध्य प्रदेश, यूपीत पराभव. पंजाबमध्ये सत्तेत. बिहारमध्ये आघाडी सरकार स्थापन केले.


> पक्षाध्यक्ष (डिसेंबर 2017 ते मे 2019)
काँग्रेस राजस्थान, मध्य प्रदेश व छत्तीसगडमध्ये जिंकली. ६ महिन्यांनंतरच्या लोकसभा निवडणुकीत पराभव झाला. २०१४ च्या तुलनेत केवळ ७ जास्त जागा मिळाल्या.

 

स्वातंत्र्यानंतर १९ काँग्रेस अध्यक्ष
> बिगर नेहरू-गांधी कुटुंबातून - १३ अध्यक्ष राहिले, त्यापैकी ७ लोकसभा निवडणुकांत ७ अध्यक्षांनी नेतृत्व केले,४ निवडणुकांत विजय.
 

> नेहरू-गांधी कुटुंबातील - ६ अध्यक्ष राहिले. सर्वांनी लोकसभेसाठी नेतृत्व केले. १० निवडणुकांत ६ वेळा काँग्रेस सरकार आले.