आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'ज्यांना मतदारसंघ सांभाळता आला नाही त्या महाराष्ट्रात काय दिवे लावणार?' - खासदार संजय काकडे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे : 'भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी गाेपीनाथगडावर केलेले भाषण भाजपच्या सच्च्या कार्यकर्त्यांचे मन दुखावणारे अाहे, असे मत भाजपचे सहयाेगी खासदार संजय काकडे यांनी व्यक्त केले.

पंकजांच्या भाषणातील मुद्दे पाच वर्षांत कृतीत उतरले असते तर एक लाख मताधिक्यांनी त्यांचा विजय झाला असता. समाजाबद्दल त्या जे बाेलत अाहेत, त्याची अंमलबजावणी सत्तेत असताना पंकजांनी कधी केली नाही. ज्यांना स्वत:चा मतदारसंघ सांभाळता अाला नाही ते महाराष्ट्रात काय दिवे लावणार?' असा सवालही काकडे यांनी केला. नेतृत्वावर टीका करणाऱ्या पंकजांवर पक्षाने कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली.

काकडे म्हणाले, 'गाेपीनाथ मुंडे यांच्यामुळे मी राज्यसभेवर गेलाे.ते अाेबीसींसह सर्वांनाच चांगल्या प्रकारे सांभाळत हाेते. पंकजांचे तसे नाही. त्यांच्या जिल्ह्यातून मला १०-१२ मराठा नेत्यांचे, कार्यकर्त्यांचे फाेन अालेले हाेते. ते म्हणाले, तुम्ही या ठिकाणी लक्ष घाला. मराठे-मुस्लिमांना त्रास हाेत अाहे. दलितांकडे दुर्लक्ष झाले अाहे. त्याचेच रुपांतर पंकजा यांच्या पराभवात झाले. अाता त्याचे खापर एखाद्या नेत्यावर फाेडणे याेग्य नाही. पक्षाला ब्लॅकमेल करुन काहीतरी गाेष्ट पदरात पाडून घ्यायची त्यांची जुनी सवय अाहे. देवेंद्र फडणवीस यांनी राज्यभरात विजय यात्रा काढली हाेती. अापला प्रत्येक उमेदवार निवडून यावा म्हणून त्यांनी प्रयत्न केले, मग अापला मंत्रीच पराभूत व्हावा, असे ते का वागतील? असा सवालही काकडेंनी केला.

 

बातम्या आणखी आहेत...