आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोक काय म्हणतील...?

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लोक काय म्हणतील यापेक्षा आपल्याला काय वाटते हे  महत्त्वाचे.  प्रत्येकाने असा विचार केला तरच बुरसटलेल्या विचारांचा नायनाट होईल.
 
मुलींचं व त्यांच्या पालकांचं अर्धं आयुष्य लोक काय म्हणतील यातच निघून जातं. इतक छान आयुष्य आहे आणि त्यात पावलोपावली फक्त लोक काय म्हणतील’ हे विचार करून घालवण्यात खरच अर्थ आहे का?  प्रत्येक घरात मानमर्यादा, प्रतिष्ठा,इज्जत या गोष्टी सांभाळल्या जातात. काही अंशी बरोबर असलं तरी खरंच हे सगळे गरजेचे आहे काय? आज 50% मुलींची स्वप्नं पूर्ण होत नाही,कारण काय तर लोक काय म्हणतील!

बुरसटलेल्या विचारांचा हा समाज दोन दिवस बोलणार आणि विसरून जाणार. हे लोक पायी चालू देत नाही आणि घोड्यावर नाही. मुली आज कोणत्याच क्षेत्रात मागे नाहीत,एखादी मुलगी 23-24 ची झाल्यावर लगेच लग्न कधी करणार, असं बोलून तिच्या आईवडिलांना विचारतातच. जी मुलगी शिक्षण घेऊ इच्छिते, ज्या मुलीच्या पालकांच्या खूप अपेक्षा आहे. त्या एका गोष्टीमुळे स्वप्नांवर पाणी फेरले जाते! त्या मुलीच्या काय अपेक्षा आहेत तिला तिचं करिअर कशा पद्धतीने करायचे आहे हे सगळे विचारात न घेता. फक्त लोक काय म्हणतील याचाच विचार केला तर प्रत्येकाला स्वप्न विचार सोडून जगावे लागेल.

एकीकडे लोक चंद्रावर गेले आहेत. दुसरीकडे असली विचारसरणी! 
दुसऱ्या बाजूने विचार केल्यास आजच्या तरुण पिढीचे उद्योग, प्रेमप्रकरण यामुळेदेखील समाजामध्ये असे विचार असावेत कदाचित. कारण या गोष्टींचे वाढत्या प्रमाणामुळेदेखील पालक लवकर लग्नाचा निर्णय घेत असतील. आपल्या मुलीने चुकीचे  पाऊल उचलू नये म्हणून कदाचित हे बरोबर असावे, पण ज्यांना खरंच काही तरी करायचे आहे त्यांचादेखील अशा गोष्टींमुळे बळी जातो. लोक काय म्हणतील यावर फक्त मुलीचं लग्न हा एकमेव उपाय नाही. तर माझ्या मते प्रत्येकाने आपले विचार सुधारावे.  लोक काय म्हणतील यापेक्षा आपण कुठे कमी पडतोय हा विचार करावा व तशी आपल्या पाल्याला त्याची जाणीव करून द्यावी.  लोक काय म्हणतील यापेक्षा आपल्याला काय वाटते हे नक्कीच महत्त्वाचे. प्रत्येकाने असा विचार केल्यास बुरसटलेल्या विचारांचा नायनाट होणार हे नक्कीच!

बातम्या आणखी आहेत...