आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • WhatsApp Brings New Features; Share Your 'WhatsApp Status' On Facebook, Learn Process

व्हॉट्सअ‍ॅपने आणले नवीन फिचर; फेसबूकवर शेअर करू शकता आपले 'व्हॉट्सअॅप स्टेटस', जाणून घ्या प्रोसेस

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गॅजेड डेस्क- व्हॉट्सअ‍ॅप आणि फेसबूक वापरणाऱ्यांसाठी ही चांगली बातमी आहे. आता तुम्ही तुमचे व्हॉट्सअॅ स्टेटस थेट फेसबूक स्टोरीजवर शेअर करू शकणार आहात. हे फिचर फेसबुकवर इन्स्टाग्राम स्टोरी शेअर केल्यासारखेच आहे. आता व्हॉट्सअ‍ॅपनेही त्याप्रमाणेच आपले स्टेटस अपडेट्स थेट फेसबुक स्टोरीजवर शेअर करण्याचे ऑप्शन आणले आहे. यापूर्वी, जूनमध्ये अँड्रॉइड बीटा वापरणाऱ्या निवडक व्हॉट्सअ‍ॅप यूजर्सना फीचर वापरता येत होते, पण आता हे फिचर सर्वांना वापरता येणार आहे.कसे कराल शेअर  ?
1. व्हॉट्सअॅप उघडा आणि ‘MY STATUS’ वर जा
2. स्टेटस समोरील तीन डॉटवर क्लिक करून, SHARE TO FACEBOOK वर क्लिक करा
3. त्यानंतर तुमच्या मोबाईल मधील फेसबूक अॅप ओपन होईल, त्यावर व्हॉट्सअॅप स्टेटस शेअर करा
यासोबतच, आपण थेट व्हॉट्सअ‍ॅपवरून फेसबुक स्टोरी प्रायव्हसी सेटिंग्ज बदलू शकता. आपल्याला आपले स्टेटस कोणाला दाखवायचे आहे, ते आपण यातून निवडू शकता. म्हणजे, आपल्याला हे फक्त आपल्या मित्रांना दाखवायचे आहे, का पब्लिक करायचे आहे, ते यावरुन निवडू शकता.
व्हॉट्सअ‍ॅप प्रमाणेच फेसबुक स्टोरीही आपल्या फेसबूकवर 24 तास राहीले. तुम्ही व्हॉट्सअ‍ॅपवरुन आपले मूळ स्टेटस डिलीट केले तरीही, शेअर केलेली फेसबुक स्टोरी 24 तास फेसबुकवर असेल. पण यात एक अडचण आहे. तुम्ही शेअर केलेले स्टेटस इतरांना फेसबूकवर दिसणार नाही. कारण, फेसबूक फक्त व्हॉट्सअॅपवरील व्हिडिओमधून फोटो आणि लिहीलेला मजकूर कॅप्चर करुन त्याला फेसबूकवर शेअर करतो. 

बातम्या आणखी आहेत...