आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

WhatsApp ने भारतात लॉन्च केले हे ग्रँड चॅलेंज, जिंकू शकता 1.8 कोटी रूपये, जाणून घ्या पूर्ण प्रोसेस...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- भारतात उद्योगपती आणि छोट्या व्यावसायीकांना प्रेरणा देण्यासाठी फेसबूकच्या ताब्यात असलेला मेसेजिंग अॅप व्हाट्सअॅपने 'स्टार्टअप इंडिया-व्हाट्सअॅप ग्रँड चॅलेंज' ची घोषणा केली. कंपनीकडून सांगण्यात आले आहे की, कंपनी पाच स्टार्टअप्सला एकूण 2,50,000 डॉलर (अंदाजे 1 कोटी 77 लाख रूपये) देणार आहे.

 
टॉप 5 विजेत्यांना 1.8 कोटी रूपयांचे वितरण केले जाईल
व्हॉट्सअॅपने भारतात 'स्टार्टअप इंडिया व्हॉट्सअॅप ग्रँड चॅलेंज' ला लाँच केले आहे. याचे आयोजन भारताच्या स्टार्टअप आणि आंत्रप्रेन्योर सेक्टर ला वाव मिळावी म्हणून देण्यात आली आहे. नियमानुसार, टॉप 5 विजेत्यांना 1.8 कोटी रूपयांचे वाटप केला जाईल. व्हॉट्सअॅपने आपल्या मिडिया रिलीजमध्ये म्हटले, 'भारतातील स्थानिक समस्याना सुधारण्यासाठी आणि मोठ्या स्तरावर सामाजिक-आर्थिक प्रभाव टाकू शकणारे आयडिया बिझनेस मॉडलसोबत व्यापार करण्याची इच्छा असणारे यात भाग घेऊ शकतात.' 

 

 

सुरू झाले आहे रजिस्ट्रेशन 
या चॅलेंजमध्ये भाग घेण्यासाठी रजिस्ट्रेशन सुरू झाले आहे, जे 10 मार्च 2019 पर्यंत चालेल. सगळ्या अॅप्लिकेशन्सचे मूल्यांकन एक स्वतंत्र कमिटी करेल. जिंकणाऱ्या प्रत्येक आयडियाला प्रत्येकी 50 हजार डॉलर (आंदाजे 35.6 लाख रूपये) दिले जातील. याप्रमाणे एकुण रक्कम 1.78 कोटी रूपये आहे. विजेत्यांची घोषणा  24 मेला होईल.

 

व्हॉट्सअॅपचे व्हाट्सऐप जगभरात 1.3 अब्ज युझर आणि भारतात 20 कोटी युझर्स आहेत. 

बातम्या आणखी आहेत...