WhatsApp ने आणले / WhatsApp ने आणले हे नवीन फीचर्स, अशाप्रकारे करणार काम; तुमच्यासाठी असू शकते फायदेशीर

दिव्य मराठी वेब टीम

Dec 18,2018 12:11:00 AM IST

गॅजेट डेस्क : WhatsApp ने अँड्रॉइड यूचर्ससाठी पिक्चर-इन-पिक्चर (PIP) फीचर उपलब्ध केले आहे. व्हॉट्सअॅपने ऑक्टोबर महिन्यात पिक्चर-इन-पिक्चर (PIP)च्या अँड्रॉइडच्या बीटा अॅपला लागू केले होते. अॅपमध्ये एक छोटी विंडो ओपन होणार आहे. यामध्ये इंस्टाग्राम, फेसबुक आणि YouTube व्हिडिओ पाहण्यात येणार आहे.

बीटा फेजमधील टेस्टिंगनंतर आता शेवटी अँड्रॉइड प्लॅटफॉर्मसाठी स्टेबल अपडेट जारी केले आहे. गूगल प्ले-स्टोरवरून वर्जन 2.18.280 अपडेट करता येणार आहे. PIP सपोर्ट मिळाल्यानंतर आपण एखाद्या YouTube लिंकवर क्लिक केल्यास तो व्हिडिओ अॅपमध्येच प्ले होण्यास सुरूवात होईल.

याशिवाय WhatsApp अनेक नव्या फीचर्सवर काम करत आहे. काही दिवसांपूर्वीच आयफोन अॅपसाठी ग्रुप कॉलिंग बटन जारी करण्यात आले होते. हे फीचर अँड्रॉइड युजर्ससाठी लवकरच जारी करण्याची आशा आहे. याआधी ग्रुप ऑडिओ किंना व्हिडिओ कॉल करण्यासाठी एकासोबत संपर्क साधल्यानंतर दुसऱ्याला कॉल करावा लागत होता. पण आता या फीचरमुळे कॉल करण्यापूर्वीच आपल्याला ज्या व्यक्तीशी संवाद साधायचा आहे, त्यांना सोबतच जोडू शकता.

WhatsApp ने नोव्हेंबरच्या महिन्याच्या अखेरीस अँड्रॉइड प्लॅटफॉर्मवर मल्टी-शेअर फीचरला अपग्रेड केले आहे. फीचरच्या अपग्रेडेशननंतर आपण एखाद्या थर्ड पार्टी अॅप किंवा टेक्स्टला दोन किंवा त्याहून अधिक लोकांना शेअर करण्यापूर्वी सर्वात अगोदर त्याचा प्रीव्ह्यू दाखवण्याचे काम व्हॉट्सअॅप करत आहे.

X
COMMENT