आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोशल सत्य : 4 किडनी पाहिजे असतील तर या नंबरवर फोन करा... फोन केला तर समोर आली भलतीच कहाणी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नो फेक न्यूज डेस्क - सोशल मीडियावर सध्या एक मॅसेज व्हायरल होत आहेत. त्यात किडनी डोनेट करण्याबाबत चर्चा केली जात आहे. सुधीर नावाचे व्यक्ती आणि त्यांच्या पत्नीचा अपघाती मृत्यू झाला असून त्यांच्या कुटुंबीयांना त्यांच्या किडनी डोनेट करायच्या असल्याचा दावा या मॅसेजमध्ये केला जात आहे. या मॅसेजबरोबर एक कॉन्टॅक्ट नंबरही दिला जात आहे. 

 
पण आम्ही याची माहिती घेतली असता हा फेक मॅसेज असल्याचे समोर आले. तसेच हा मॅसेजही फार जुना असल्याचे समोर आले. या नंबरवर फोन केला तेव्हा फोन कट करण्यात आला. 


असा आहे व्हायरल मॅसेज.. 

महत्त्वाचे, 4 किडनी उपलब्ध 
मिस्टर सुधीर आणि त्यांच्या पत्नीचा काल अॅक्सिडेंटमध्ये मृत्यू झाला. डॉक्टरांनी त्यांना ब्रेन डेड जाहीर केले केले. सुधीर यांचा ब्लड ग्रुप B+ आणि त्यांच्या पत्नीचा O+ आहे. त्यांचे कुटुंबीय मानवतेच्या भावनेतून त्यांच्या किडनी डोनेट करू इच्छितात. 


तपास : का खोटा आहे मॅसेज.. 
या मॅसेजचे सत्य जाणून घेण्यासाठी आम्ही या नंबरवर कॉल केला. पण त्यांनी सांगितले की, हा मॅसेज पूर्णपणे खोटा आहे. पण आम्ही जेव्हा त्यांना विचारले की, त्यांना नंबर मॅसेजमध्ये कसा आला, तेव्हा त्यांनी उत्तर न देता फोन कापला. 


असे मॅसेज पसरवणे हा गुन्हा 
अशा प्रकारचे मॅसेज कोणत्याही माध्यमातून पसरवणे हा गुन्हा आहे. ह्युमन ऑर्गन ट्रान्सप्लान्ट अॅक्ट-1994 च्या कलम 19 अंतर्गत मानवी अवयवांचा व्यावसायिक व्यवहार करण्यासाठी शिक्षेची तरतूद आहे. त्याशिवाय आयटी अॅक्ट-2000 च्या कलम -66डी नुसार आणि आयपीसीच्या कलम -420 अंतर्गतही असे मॅसेज पसरवणे हा गुन्हा आहे. 


कसे होते अवयव दान.. कोण करू शकते.. 
ब्रेन डेड व्यक्तीच अवयव दान करू शकते. ब्रेन डेड ही अवस्था म्हणजे व्यक्तीचा मेंदू पूर्णपणे काम करणे बंद करणे ही होय. या काळातच व्यक्तीचे हृदय, किडनी किंवा इतरक काही अवयव मात्र काम करत असतात अशावेळी ते दान करता येतात. कोणताही व्यक्ती अवयव दान करू शकतो. त्यासाठी वयाची अट नाही. 18 वर्षापेक्षी कमी वयाच्या दात्याच्या अवयव दानासाठी त्याच्या आई वडिलांची मंजुरी गरजेची असते. 


कसे होते अवयव दान.. 
ब्रेन डेड व्यक्तीला व्हेंटिलेटरवर ठेवून त्याचा मृत्यू झाल्याचे जाहीर केले जाते. त्यानंतर कुटुंबीयांच्या संमतीनंतर अवयव काढून इतर गरजू रुग्णाला प्रत्यारोपित केले जातात. त्यासाठी कायदेशीर प्रक्रियेतून जावे लागते. अवयवांचे प्रत्यारोपण करणाऱ्या हॉस्पिटलकडे गरजू रुग्णांची यादी असते, सर्वाधिक गरज असलेल्या व्यक्तीला आधी असे अवयव दिले जातात. त्याआधी अनेक प्रकारच्या टेस्ट कराव्या लागतात. 

बातम्या आणखी आहेत...