आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्हॉट्सअॅपचे प्रमाण चिंताजनक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपल्या व्यग्र दिनक्रमात एकमेकांना भेटू न शकणारे मित्र आणि नातेवाईक व्हॉट्सअॅपसारख्या सोशल नेटवर्किंग साइट्समुळे संपर्कात राहू शकतात. तरुणाईसाठी तर ‘दिल की धडकन’ झालेले हेच व्हॉट्सअॅप कुटुंबव्यवस्थेला हानिकारक ठरत आहे. जगभरात व्हॉट्सअॅपवरील संदेश घटस्फोटांच्या प्रकरणांमध्ये पुराव्यादाखलही वापरण्यात येत आहेत. व्हॉट्सअॅपमुळे अनेक नवे मित्र-मैत्रिणी बनवून आपल्या साथीदाराला धोका देण्याचे प्रमाणही वाढले आहे. वैयक्तिक गोष्टी मित्र-मैत्रिणींसोबत शेअर करण्याचे प्रमाण वाढले असून, याचे दूरगामी परिणाम संबंधितांच्या जीवनावर होत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. स्मार्टफोन आणि इंटरनेटची सहज उपलब्धता असल्यामुळे व्हॉट्सअॅपचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. परिणामी नातेसंबंधांमध्ये तणाव, फसवणूक आणि घटस्फोटांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. तंत्रज्ञानाच्या अति आणि गैरवापरामुळे कुटुंबव्यवस्था आणि समाजावर मोठा परिणाम होत आहे. यावर वेळीच नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे.
- प्रा. मधुकर चुटे, नागपूर