Home | Business | Gadget | whatsapp new feature for android phone users fingerprint will be visible soon

WhatsApp New Feature: लवकरच फिंगरप्रिंट ऑथेंटिकेशन फीचर, जाणून घ्या कसे करेल काम...

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jan 09, 2019, 12:42 PM IST

व्हाट्सअॅपचे नवीन फिंगरप्रिंगत फीचर.

  • whatsapp new feature for android phone users fingerprint will be visible soon

    नवी दिल्ली - व्हाट्सअॅप काही दिवसांपासून एका नवीन फीचरवर काम करत आहेत. हे फीचर अँड्रॉयड आणि आयओएस या दोन्ही युझर्ससाठी आहे. काही दिवसांपूर्वी एक माहिती मिळाली होती की, व्हाट्सअॅप डार्क मोड फीचर अँड्रॉयड क्यू अपडेटसोबत येईल, पण एका नवीन रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे की, व्हाट्सअॅप अँड्रॉयड यूझर्सना लवकरच व्हाट्सअॅप फिंगरप्रिंट ऑथेंटिकेशनचे फीचर देईल. यानंतर व्हाट्सअॅप जास्ती सिक्योर होईल.

    व्हाट्सएपच्या फीचरवर लक्ष ठेवणारी वेबसाइट WABetaInfo ने सांगितले की, व्हाट्सअॅप बीटा अँड्रॉयड 2.19.3 अपडेटमध्ये फिंगरप्रिंट ऑथेंटिकेशन फीचर मिळणार आहे. त्याशिवाय व्हाट्सअॅप फेसआयडी आणि टच आयडी फीचरवर काम सुरू आहे.


    व्हाट्सअॅपमध्ये एक नवीन ऑप्शन मिळत आहे, ज्याच्या मदतीने या फीचरला अॅक्टिवेट करता येईल. हे फीचर आयओएससाठी लवकरच येईल. हे फीचर आल्यानंतर व्हाट्सएपमध्ये एक सिक्योरिटी लेयर येईल. या फीचरला ऑन केल्यानंतर यूझर्सना प्रत्येकवेळी व्हाट्सअॅप ओपन करण्यासाठी फिंगरप्रिंटचा वापर करावा लागेल.


    पण सध्या हे फीचर व्हाट्सअॅपवर वापरले जाते, पण हे फीचर थर्ड पार्टी अॅपच्या मदतीने यूज होते. महत्त्वाचे हे आहे की, व्हाट्सअॅपवर नवीन ऑडियो फीचरदेखील येणार आहे. यामुळे व्हॉइस मेसेजला ऑटोमॅटिक प्ले केले जाऊ शकेल. पण ऑटोमॅटिक प्ले होण्यासाठी सगळ्या व्हॉइस मेसेजला एका क्रमात येणे गरजेचे आहे.

Trending