आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आधी भारत आता जगभरात बदलणार व्हॉट्स अॅप; जाहीर केला मोठा निर्णय

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- तुम्ही व्हॉट्स अॅप (WhatsApp) वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. व्हॉट्स अॅप लवकरच जगभरात एकावेळी फक्त 5 जणांनाच मेसेज फॉरवर्ड करण्याचा नियम लागू करणार आहे. व्हॉट्स अॅपवर पसरणाऱ्या अफवा, खोटी माहिती थांबवण्यासाठी व्हॉट्स अॅपने मागील वर्षी जुलैमध्ये भारतात हा नियम लागू केला होता. 

 

युझर्सच्या फिडबॅकनंतर घेण्यात आला निर्णय
कंपनीने सांगितले की, 'मागील सहा महिन्यांच्या कालावधीत व्हॉट्स अॅपने युझर्सच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. त्यानंतर कंपनीने याची चाचणी घेतली. यातून समोर आलेल्या माहितीच्या आधारावरच हा निर्णय घेण्यात आला असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.'  त्यानुसार आता जगभरातील युझर्स व्हॉट्स अॅपच्या नव्या व्हर्जनमध्ये एकावेळी फक्त पाच जणांनाच मेसेज फॉरवर्ड करु शकरणार आहेत.

 

भारतात आहे सर्वाधिक व्हॉट्स अॅप युझर
व्हॉट्स अॅपचे सर्वाधिक युझर भारत, ब्राझिल आणि इंडोनेशियामध्ये आहे. व्हॉट्स अॅपच्या अधिकाऱ्यांनी सांगितल्यानुसार, व्हायरल कंटेंटची समस्या सोडवण्यासाठी कंपनी अशाप्रकारचे नवीन मार्ग शोधणार आहे. त्यामुळे कोणतीही अफवा पसरवण्याआधी युझर्सला शंभरवेळा विचार करावा लागणार आहे.

 

सरकारच्या निशाण्यावर आहे डिजिटल प्लॅटफॉर्म
सध्या जगभरात सर्व देशांचे सरकार आणि रेग्युलेटरी डिजिटल प्लॅटफॉर्म अफवा, खोट्या माहितीला आळा घालण्यासाठी महत्वाचे निर्णय घेत आहे. काही महिन्यांपूर्वी भारतात सोशल मीडियावर मॉब लिचिंगच्या घटना व्हायरल झाल्यानंतर सरकारने तातडीने व्हॉट्स अॅपला याची माहिती कळवली होती. सध्या भारतात व्हॉट्स अॅपचे 20 कोटीपेक्षा जास्त युझर्स असून देशात मोठ्या प्रमाणात खोटी माहिती, अफवा पसरवण्यासाठी व्हॉट्स अॅपचा वापर केला जात आहे.

 

 

बातम्या आणखी आहेत...