भारतात 20 कोटी WhatsApp यूजर्सना Alert, हे दोन अॅप डिलीट केले नाही तर बंद होणार अकाउंट

दिव्य मराठी वेब टीम

Mar 12,2019 02:14:00 PM IST

गॅजेट डेस्क - व्हॉट्सअॅपच्या नावाने अनेक प्रकारचे फेक अॅप्स सुरू आहेत. त्यापैकी GBWhatsApp आणि WhatsApp Plus हे दोन्ही अॅप फेक आहेत. हे दोन्ही अॅप ऑटो रिप्लाय, व्हॉट्सअॅप स्टोरी सेव्हिंग आणि डाउनलोड या फीचर्ससह येतात. आता व्हॉट्सअॅपने अशा अॅप वापरणाऱ्या ग्राहकांना सतर्क केले आहे. यापुढे ज्यांनीही अशा प्रकारचे अॅप वापरले त्यांचे व्हॉट्सअॅप अकाउंट बंद केले जाणार आहे. आपल्याला व्हॉट्सअॅप अकाउंट बंद झाल्याचे मेसेज सुद्धा पाठवले जाईल. फेक अॅप वापरल्यामुळे आपले खाते बंद झाल्याचे या मेसेजमध्ये कळवले जाईल. अशात पुन्हा अकाउंट सुरू करण्यासाठी आपल्याला फेक व्हॉट्सअॅप मोबाईलमधून अनइंस्टॉल करून नव्याने अधिकृत व्हॉट्सअॅप अॅप इंस्टॉल करावे लागणार आहे. अशा पद्धतीने आपण पुन्हा आपले मेसेजिंग अकाउंट सुरू करू शकता.


का आहे धोका..?
व्हॉट्सअॅपने जारी केलेल्या माहितीनुसार, हे दोन्ही अॅप फेक आणि मॉडिफाइड आहेत. ते ग्राहकांना कुठल्याही प्रकारच्या सायबर सुरक्षेची खात्री देत नाहीत. अशा अॅप्स व्हॉट्सअॅप कंपनीच्या नियमांचे उल्लंघन करतात. व्हॉट्सअॅपने आपल्या ग्राहकांना हे दोन्ही अॅप वेळीच मोबाईलमधून काढण्याचा इशारा दिला आहे.


ओरिजनल अॅप पुन्हा वापरण्यापूर्वी करून घ्या बॅक-अप
- कंपनीने सांगितल्याप्रमाणे, ओरिजन अॅपवर पुन्हा अकाउंट सुरू होण्यापूर्वी किंवा आपले खाते बंद होण्यापूर्वी चॅट हिस्ट्रीचा बॅक-अप करून घ्यावा. बॅक-अप घेण्यासाठी तात्पुरत्या बंदीचा कालावधी संपण्याची वाट पाहा. टायमर आपल्याला सांगणार की ही बंदी कधी उठणार आहे.
- GB WhatsApp मध्ये More options - chats - back up chats वर जावे.
- आता फोन सेटिंग्समध्ये tap storage - Files वर जावे.
- GB WhatsApp च्या फोल्डरमध्ये जाऊन ते सिलेक्ट करावे.
- अप्पर राइट कॉर्नरमध्ये रीनेम आणि रीनेम फोल्डर असे दोन पर्याय दिसतील.
- आता प्ले स्टोअरवर जाऊन व्हॉट्सअॅपचे अधिकृत अॅप डाउनलोड करा.
- व्हॉट्सअॅपमध्ये आपले ऑफिशियल नंबर व्हेरिफाय केले जाईल.
- आता बॅक-अपला रीस्टोअर करण्यासाठी ऑप्शन येईल. यावर क्लिक करताच चॅट फोनमध्ये येईल.

X
COMMENT