आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

What'sApp युझर्ससाठी वाईट बातमी, अनसेव्ह डेटा होणार डिलीट; गुगल ड्राइव्हवर बॅकअप घेणे आहे आवश्यक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोशल डेस्क - What'sApp युझर्सचा अनसेव्ह डेटा आपोआप डिलीट होणार आहे. यामुळे आपला डेटा आणि चॅट हिस्ट्रीचे गुगल ड्राइव्हवर बॅकअप न घेणाऱ्या युझर्सना नुकसान होणार आहे. नियमितपणे बॅकअप अपडेट करणे आवश्यक आहे, अन्यथा Google Drive मधून डेटा डिलीट करण्यात येईल.


अँड्रॉइड युझर्सना अॅप अपडेट करणे आवश्यक
What'sApp ने इशारा दिला आहे की, एका वर्षात ज्यांनी बॅकअप अपडेट केले नाही, त्यांचा डेटा Google Drive वरून हटवण्यात येणार आहे. यापासून वाचण्यासाठी, Android फोन युझर्सना देखील अॅप अपडेट करावे लागणार आहे.

 

मागील महिन्यात गुगलसोबत केला होता करार
मागील वर्षी ऑगस्टमध्ये What'sApp ने गुगल सोबत युझर्सचा डेटा स्टोअर करण्यासाठी करार केला होता. जेणेकरून, युझर्सना त्यांच्या फोन मेमरीचा जास्तीत जास्त वापर करण्यात येईल. सोबतच फोन बदलल्यानंतर जुना डेटा त्यामध्ये पुन्हा मिळवता येईल. 2009 मध्ये लाँच झालेले What'sApp सर्वात जास्त वापरले जाणारे मेसेजिंग अॅप आहे. जगभरातील 180 देशांमध्ये What'sApp चे 1.5 अरब युझर आहेत. तर भारतात What'sApp वापरकर्त्यांची संख्या 20 कोटी आहे.

बातम्या आणखी आहेत...