• Home
  • Business
  • WhatsApp Update : control who from your contacts can add you to WhatsApp group chat

मेसेजिंग / 'व्हॉट्सअप'ने ग्रुप सेटिंगमध्ये आणले नवीन फीचर, ग्रुपमध्ये कोण सामील करणार आणि कोण नाही हे युझर्स ठरवणार

व्हॉट्सअपचे नवीन फीचर कसे वापरावे यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा व्हॉट्सअपचे नवीन फीचर कसे वापरावे यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा

व्हॉट्सअ‍पचे जगभरात दीड अब्ज तर भारतात 40 कोटींहून अधिक वापरकर्ते आहेत
 

Nov 07,2019 04:43:00 PM IST


गॅजेट डेस्क - व्हॉट्सअपने आपल्या युझर्ससाठी एक नवीन फीचर आणले आहे. या फीचरच्या मदतीने युझर असे कॉन्टॅक्ट्स निवडू शकतात की जे त्यांना कोणत्याही ग्रुपमध्ये समाविष्ट करू शकणार नाहीत. किंवा ग्रुपमध्ये येण्याचे आमंत्रण देऊ शकणार नाहीत. व्हॉट्सअप ऑपरेट करणारी कंपनी फेसबुकने जगभरातील युझर्ससाठी हे फीचर सुरू केले आहे.


व्हॉट्सअपमध्ये ग्रुपबाबत पहिल्यापासूनच असलेले 'Nobody' हे ऑप्शन कायम राहणार आहे. यासोबत 'My Contacts Except' हे नवीन ऑप्शन देण्यात आले आहे. युझर्सची इच्छा असेल तर 'Nobody' ऑप्शनचा उपयोग करू शकतात. अशात जेव्हा एखादा दुसरा युझर तुम्हाला ग्रुपमध्ये समाविष्ट करेल, तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुमच्या फोनवर येईल.


माय कॉन्टेक्ट एक्स्पेक्ट मध्ये मिळणार ऑप्शन

व्हॉट्सअपने आपल्या ब्लॉगमध्ये सांगितले की "या नवीन फीचरबाबत युझर्सच्या प्रतिक्रिया आल्या आहेत. सुरुवातील आम्ही 'नोबडी' हे ऑप्शन दिले होते. मात्र लोकांच्या प्रतिक्रियांनंतर आम्हा यामध्ये 'माय कॉन्टॅक्ट एक्सेप्ट' हे नवीन फीचर दिले आहे. या फीचरमार्फत युझर तेच कॉन्टॅक्ट्स निवडू शकेन ज्यांच्या ग्रुपमध्ये तुम्हाला सामिल व्हायचे नसेल.


Settings => Privacy => Groups => Everyone, My Contacts, My Contacts Except, Nobody

पेगाससमुळे व्हॉट्सअपवर झाली होती टीका

मोबाइल डेटा अॅनालिटिक्स आणि इंटेलिजेंस फर्म 'सेन्सर टॉवर'ने आपल्या रिपोर्टमध्ये म्हटले होते की,"स्पायवेअर पेगाससच्या वापरामुळे भारतासह जगभरातील 1400 हून अधिक व्हॉट्सअप युझर्सची खासगी माहिती चोरण्याच आली आहे. प्रामुख्याने पत्रकार आणि मानवाधिकार कार्यकर्त्यांवर पाळत ठेवण्यात आली." यानंतर, 26 ऑक्टोबर ते 9 नोव्हेंबर (7 दिवस) पर्यंत, 'सिग्नल' आणि 'टेलीग्राम' सारख्या इतर एंड-टू-एंड एनक्रिप्टेड अ‍ॅप्सकडे कल वाढला आहे. सिग्नल अॅप डाउनलोडमद्ये 63% आणि टेलिग्राम मेसेंजरच्या डाउनलोड्समध्ये 10% वाढ झाली. टेलिग्राम अॅपने आता 9.20 लाख डाउनलोड्सचा आकडा पार केला आहे. सध्या जगभरात व्हॉट्सअपचे दीड अब्ज युझर्स आहेत. यातील 40 कोटींपेक्षा अधिक युझर्स भारतात आहेत.

X
व्हॉट्सअपचे नवीन फीचर कसे वापरावे यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक कराव्हॉट्सअपचे नवीन फीचर कसे वापरावे यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा