Home | Business | Gadget | whatsapp warns users avoid these things or face jail, after supreme court hearing

WhatsApp वर या एका चुकीमुळे बंद होईल अकाउंट, तुरुंगातही जावे लागेल; SC च्या निरीक्षणानंतर कंपनीचा इशारा

दिव्य मराठी वेब टीम | Update - Dec 10, 2018, 06:45 PM IST

कंटेन्टच्या बाबतीत तक्रार मिळाल्यास अकाउंट बंद करण्यासह कायदेशीर कारवाई केली जाईल.

 • whatsapp warns users avoid these things or face jail, after supreme court hearing

  गॅजेट डेस्क - व्हॉट्सअॅपने यूजर्सला अलर्ट करताना काही सूचना जारी केल्या आहेत. यापुढे या सूचनांचे पालन केल्यास आपले व्हॉट्सअॅप अकाउंट आणि ग्रुप बॅन केले जाईलत. एवढेच नव्हे, तर तुरुंगातही जाण्याची शक्यता आहे. या प्लॅटफॉर्मवर कुठल्याही प्रकारची चाइल्ड पॉर्नोग्राफी सहन केली जाणार नाही. सोबतच, कंटेन्टच्या बाबतीत तक्रार मिळाल्यास अकाउंट बंद करण्यासह कायदेशीर कारवाई केली जाईल. व्हॉट्सअॅपने चाइल्ड पॉर्नोग्राफी अतिशय घाणेरडे म्हटले आहे.

  मेसेज पाहू शकत नाही WhatsApp

  कंपनीने सांगितल्याप्रमाणे, आम्ही कुणाचेही मेसेज पाहू शकत नाही. परंतु, एखाद्या यूजरबाबत तक्रार आल्यास त्याचे अकाउंट बंद करू शकतो. व्हॉट्सअॅपने हे स्पष्टीकरण सुप्रीम कोर्टाच्या निरीक्षणानंतर दिले आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे, नुकतेच सुप्रीम कोर्टाने केंद्र आणि इंटरनेट जायंट गूगल, मायक्रोसॉफ्ट, फेसबूक इत्यादी माध्यम रेप, चाइल्ड पॉर्नोग्राफी आणि आक्षेपार्ह कंटेन्ट बंद करण्यासाठी सहकार्य करतील असे निरीक्षण नोंदवले होते.


  या गोष्टी केल्यास जावे लागेल तुरुंगात
  1. ग्रुप अॅडमिन आहात आणि आपल्या ग्रुपवर कुठल्याही प्रकारचा आक्षेपार्ह व्हिडिओ, फोटो किंवा मेसेज शेअर झाल्यास...
  2. कुठल्याही धार्मिक व्हिडिओ, फोटो, टेक्स्ट, ऐतिहासिक आकडे शेअर केल्यास...
  3. जात किंवा धार्मिक भावना भडकतील असे मजकूर शेअर केल्यास आपल्याला तुरुंगात जाण्याची वेळ येऊ शकते.

Trending