आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्हॉट्सअॅप आणतंय नवीन फीचर, ठराविक वेळेनंतर आपोआप डिलीट होतील चॅटमधील मेसेज

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गॅजेट डेस्क - व्हॉट्सअॅप आपल्या नवीन डिसअपिअरिंग मेसेज फीचर रोल आउट करण्याच्या तयारीत आहे. हे फीचर एखादी पोस्ट किंवा मेसेज निश्चित वेळेनंतर आपोआप डिलीट करेल. सध्या कंपनीच्या या फीचरची टेस्टिंग करत आहे. डेव्हलपर्सचे म्हणणे आहे की, हे फीचर अँड्राईड युझर्ससाठी व्हॉट्सअॅप बीटा v2.19.275 व्हर्जनसोबत जारी करण्यात आले आहे. 

व्हॉट्सअॅप फीचरला ट्रॅक करणाऱ्या WABetaInfo वेबसाइटच्या रिपोर्टनुसार व्हॉट्सअॅप नवीन फीचरवर काम करत आहे. यामध्ये डिसअॅपिअरिंग मेसेज फीचरचा समावेश आहे. वेबसाइटनुसार या नवीन फीचरच्या मदतीने ज्या मेसेजला डिसअॅपिअर सिलेक्ट केले जाईल, तो चॅटमधून आपोआप डिलीट होईल. जर संपूर्ण चॅटला डिसअॅपिअर्ड मार्क केले तर चॅटवरील संपूर्ण मेसेज डिलीट होतील. संवेदनशील माहिती व्हॉट्सअॅपवर शेअर करणाऱ्या लोकांसाठी हे फीचर उपगोयी पडणार आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...