Home | Business | Gadget | WhatsApp will not work on this mobile phone

ज्यांच्याकडे आहे हा फोन, ते नाही वापरू शकणार WhatsApp, जाणून घ्या कारण...

प्रतिनिधी | Update - Jan 02, 2019, 12:01 AM IST

नवीन वर्षापासून या यूझर्सना होऊ शकतो त्रास.

 • WhatsApp will not work on this mobile phone

  गॅजेट डेस्क- सध्याच्या काळात मेसेजिंग अॅप WhatsApp सगळ्यात जास्त वापरल्या जाणारे अॅप आहे. त्यामुळेच कंपनी वेळोवेळी आपल्या ग्राहकांसाठी नवीन नवीन फीचर्स आणते. परत एकदा WhatsApp त्यांचे अपडेट आणले आहे ज्यात काही यूझर्सना त्याचा त्रास होऊ शकतो. आजपासून काही जुन्या ऑपरेटिंग सिस्टीममध्ये WhatsApp सपोर्ट नाही करणार. त्यामुळे WhatsApp आता या फोनमध्ये त्याचं फीचर अपडेट करणार नाहीये. WhatsApp चे काही फीचर्स आपोआप बंद होऊ शकतात.

  यामुळे घेतला निर्णय
  WhatsApp कडून सांगण्यात आले आहे की, ‘हा निर्णय यामुळे घेण्यात आला आहे की, त्या प्लॅटफॉर्मसाठी आम्ही नियमित अपडेट बंद करणार आहोत. त्यातले काही फीचर्स कधीही बंद होऊ शकतात’ याआधी 31 डिसेंबर 2017 ला विंडोज फोन 8.0, ब्लॅकबेरी OS आणि ब्लॅकबेरी 10 च्या यूझर्सना याचा फटका बसला होता आणि त्यांना त्यांचा फोन बदलावा लागला होता.


  या यूझर्सना होऊल त्रास
  यात सगळ्यात जास्त त्रास नोकियाच्या जुन्या ऑपरेटिंग सिस्टीम वापरणाऱ्यांना होईल. ऑपरेटिंग सिस्टीम नोकिया S40 वर चालणाऱ्या फोनमध्ये 1 जानेवारीपासून वॉट्सअॅप नाही चालणार त्याशिवाय Android 2.3.7 आणि त्यापेक्षा जुन्या व्हर्जनसोबतच iphone IoS7 आणि त्यापेक्षा जुन्या ऑपरेटिंग सिस्टीमवर 1 फ्रेब्रूवारी 2020 पासून वॉट्सअॅप चालणार नाही.


  लवकरच येऊल नवीन सिक्योरिटी फीचर
  व्हाट्सएप लवकरच आयओएस यूझर्ससाठी फेस आयडी किंवा आयडीचे फीचर आनणार आहे. व्हाट्सअॅप आपल्या यूझर्सना चांगल्या सुविधा देण्यासाठी वेळोवेळी नवीन फीचर्स आणत असते. व्हाट्सअॅपवर नवीन सिक्योरिटी फीचर आल्यानंतर व्हाट्सअॅप मेसेज नाही वाचु शकणार. साल 2018 मध्ये व्हाट्सअॅप आतापर्यंत ग्रुप व्हिडिओ कॉलिंग आणि व्हॉइस कॉलिंग, व्हाट्सअॅप पेमेंट आणि व्हाट्सअॅप स्टीकर फीचर आणले आहे. पण आता त्यात सगळ्यात जास्त सिक्योरीटी असलेले फीचर आनणार आहे. वॉट्सअॅपचे आतापर्यंत 150 कोटीपेक्षा जास्त युझर्स आहेत.

Trending