आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंटीमेट सीनच्या शूटिंगवेळी दलीप ताहिलचा सुटला होता स्वतःवरचा ताबा, छेडछाड केल्याने जयाप्रदाने लगावली होती कानशिलात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः 'कयामत से कयामत तक' आणि 'बाजीगर' या सुपरहिट चित्रपटांमध्ये झळकलेले अभिनेते दलीप ताहिल मंगळवारी वयाची 66 वर्षे पूर्ण करणार आहेत. 30 ऑक्टोबर 1952 रोजी आग्रा, उत्तरप्रदेश येथे जन्मलेले दलीप यांनी 1974 मध्ये आलेल्या 'अंकुर' चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.  1986 मध्ये आलेल्या'आखिरी रास्ता' या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अशी एक घटना घडली होती, जी दलीप कधीही विसरु शकणार नाहीत. चित्रपटाच्या शूटिंगवेळी दलीप ताहिल यांचा स्वतःवरचा ताबा सुटला होता आणि त्यांनी जयाप्रदाची छेड काढली होती. 

 

जयाप्रदा यांनी लगावली होती कानशिलात...
रिपोर्ट्सनुसार, आखिरी रास्ता या चित्रपटातील बलात्काराच्या दृश्याच्या चित्रीकरणादरम्यान दलीप ताहिल जयाप्रदा यांच्यावर प्रत्यक्षात बळजबरी करण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी जयाप्रदा यांना दलीप यांचा हेतू लक्षात येताच त्यांनी त्यांच्या कानशिलात लगावली होती. पण या घटनेनंतर जयाप्रदा यांनी डॅमेज कंट्रोल करताना म्हटले होते, की ही थापड रिअल नव्हे तर रील लाइफ होती. दलीप गेल्या दोन वर्षांपासून चित्रपटात दिसलेले नाहीत. ते अखेरचे 2016 मध्ये आलेल्या 'सलाम मुंबई' या चित्रपटात दिसले होते. त्यांनी 'फिर से', 'अनजान', 'रा.वन', 'जिंदगी तेरे नाम', 'गॉड तुस्सी ग्रेट हो', 'रेस', 'पार्टनर', 'मैंने दिल तुझको दिया', 'कहो ना प्यार है', 'मन', 'इश्क' या चित्रपटांमध्ये काम केले आहे.


जेव्हा दिग्दर्शक म्हणाला होता - रेप सीनवेळी अभिनेत्रीचे कपडे काढशील...
दलीप ताहिल यांनी काही दिवसांपूर्वी एनबीटीशी केलेल्या बातचीतमध्ये सांगितले होते की, ‘आजपासून जवळपास 25 ते 30 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. तो एक असा काळ होता जेव्हा प्रत्येक चित्रपटात बलात्कार सीन असायचा. त्यावेळी पटकथेवर जास्त लक्ष दिले जायचे नाही. काही भागांमध्ये असे चित्रपट फार चालायचे. मीदेखील अशाच एका चित्रपटात काम करत होतो. दिग्दर्शकाने मला सांगितले होते की, जेव्हा तो सीन शूट होईल तेव्हा जाऊन बिनधास्त जबरदस्ती करा. मी त्याचे म्हणणे ऐकून आश्चर्यचकित झालो. मी त्याला म्हटले की, मी एक थिएटर अभिनेता आहे, प्रोफेशनल आर्टिस्ट आहे, माझे संस्कार मला असे करण्याची परवानगी देत नाही. यावर दिग्दर्शकाने दलीप भाई हे तुम्ही काय बोलताय ? विचारले. यावर मी त्याला जे मला सांगितले तेच हिरोईनसमोर सांग असे सांगितलं असता तो घाबरला. जेव्हा हिरोईनला मी हे सांगितले तेव्हा ती घाबरलीच. ती रडू लागली आणि तेथून निघून गेली. अर्ध्या तासाने दिग्दर्शकाने माझ्याकडे तुमच्यामुळे शुटिंग बंद झाल्याची तक्रार केली. शेवटी हिरोईनला मनवत आम्ही कसेबसे पुन्हा तिला घेऊन आलो."

 

रेप सीन शूट केल्यानंतर अभिनेत्रीच्या सहमतीने बनवला व्हिडिओ...
गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या #metoo कँपेनच्या आधारे अभिनेत्री जुन्या सेक्शुअल हरॅशमेंटच्या कहाण्या ऐकवत आहेत. दलीप यांनी सावधगिरी बाळगत 'हॉस्टेज' नावाची वेबसीरिज सुरु होण्यापूर्वी एक व्हिडिओ बनवला. या वेबसीरिजमध्ये एक  रेप सीन होता. दिलीप ताहिल यांनी टीमला सांगितले की, अभिनेत्रीला काहीच आपत्ती नाही ही गोष्ट तुम्ही एनश्योर करा. शूटपुर्वी अभिनेत्री नेहाने सहमतीचा व्हिडिओ रेकॉर्ड केला.  शूट संपल्यानंतर दिलीप आणि नेहा दोघांनी पुन्हा एक व्हिडिओ बनवून जारी केला. यामध्ये दोघं सांगत आहेत की, शूट दरम्यान काहीच आपत्तिजनक झालेले नाही. 

बातम्या आणखी आहेत...