आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेव्हा अभिनेता शरद केळकर म्हणाला, शिवाजी नव्हे छत्रपती शिवाजी महाराज म्हणा... 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्कः  दिग्दर्शक ओम राऊत लवकरच तानाजी मालुसरे यांच्या पराक्रमाची कथा  ‘तानाजी : द अनसंग वॉरियर’ या चित्रपटाच्या माध्यमातून रुपेरी पडद्यावर घेऊन येत आहे. मंगळवारी दुपारी या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला. या चित्रपटात अभिनेता अजय देवगण हा तानाजी मालुसरेंच्या भूमिकेत तर अभिनेता शरद केळकर छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे. अभिनेता सैफ अली खानचीही महत्त्वाची भूमिका चित्रपटात असून तो राजपुत मोघल किल्लेदार उदयभान राठोड यांच्या भूमिकेत आहे.


‘तानाजी’ चित्रपटाच्या ट्रेलर रिलीजवेळी अजय देवगण, शरद केळकर, सैफ अली खान यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांनी कलाकारांना चित्रपटाशी संबंधित अनेक प्रश्न विचारले. शरद केळकर साकारत असलेल्या शिवाजी महाराजांच्या भूमिकेबद्दल प्रश्न विचारताना एकाने शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला. शरद केळकरने लगेचच शिवाजी नव्हे ‘छत्रपती शिवाजी महाराज’ असे म्हणायला सांगितले. शरदच्या मनातील शिवाजी महाराजांचा आदर पाहून तेथे उपस्थित असलेल्या सर्वांनी त्याच्यावर टाळ्यांचा वर्षाव केला.

या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. ‘मराठी रिट्विट’ने त्यांच्या ट्विटर अकाऊंवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत त्यांनी ‘हे जपलं पाहिजे, वाढविले पाहिजे’, असे कॅप्शन देखील दिले आहे. तसेच शरद केळकरचे सर्वत्र कौतुक होत असल्याचे पाहायला मिळते. पुढील वर्षी 10 जानेवारी रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.   

बातम्या आणखी आहेत...