आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

#MeToo: अभिनेत्रीने 'संस्कारी बाबूजी'ला म्हटले होते मुर्ख दारुडा, दाखल केला होता 1 कोटींचा खटला, घेतला होता सोबत काम न करण्याचा निर्णय

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः 90 च्या दशकातील प्रसिद्ध मालिका 'तारा'च्या लेखिका आणि निर्माती विंदा नंदा यांनी संस्कारी बाबूजी या नावाने प्रसिद्ध असलेले अभिनेते आलोकनाथ यांच्यावर बलात्काराचा आरोप लावला आहे. सोशल मीडियावर लिहिलेल्या पोस्टमध्ये त्यांनी शोची लीड अॅक्ट्रेस नवनीत निशान हिचाही लैंगिक छळ करण्याचा प्रयत्न केल्याचा उल्लेख केला आहे. आता या प्रकरणी नवनीतची 1994 मधील एक मुलाखत व्हायरल होत आहे, त्यानुसार, नवनीतने आलोकनाथवर 1 कोटींचा खटला दाखल केला होता. रिपोर्ट्सनुसार, आलोकनाथ यांनी नवनीतला ड्रग यूजर म्हटले होते. त्यानंतर तिने त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती.


नवनीतने आलोकनाथ यांना म्हटले होते मुर्ख दारुडा...

- एका इंग्रजी एंटरटेन्मेंट वेबसाइटमध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, नवनीतचा आलोकनाथची पत्नी आशू नाथसोबत वाद झाला होता. आशू नाथ तारा या मालिकेच्या कॉश्च्युम को-ऑर्डिनेटर म्हणून काम करत होता. नवनीतने तिच्या जुन्या मुलाखतीत सांगितले होते की, आलोकनाथ यांनी तिच्यावर लावलेला ड्रग यूजरचा आरोप चुकीचा आहे. नवनीत म्हणाली होती, "आज मी ज्या स्थानी आहे, तिथे पोहोचण्यासाठी मला आठ वर्षे लागली. एखाद्या मुर्ख दारुड्या व्यक्तीमुळे माझे करिअर उद्धवस्त व्हावे, असे मला वाटत नाही." या घटनेनंतर नवनीतने आलोकनाथसोबत कधीही काम न करण्याचा निर्णय घेतला होता. 

 

नवनीतने आलोकनाथच्या लगावली होती थोबाडीत... 
- विंटा नंदाने यांनी त्यांच्या लेटेस्ट पोस्टमध्ये लिहिले, "त्याने माझ्या शोची (तारा) लीड अॅक्ट्रेस (नवनीत) ला हॅरेस केले होते. तिच्यासोबत तो गैरवर्तन करायचा. पण आम्ही सगळे गप्प राहायचो. जेव्हा नवनीतने माझ्याकडे त्याची (आलोक नाथ) तक्रार केली, तेव्हा मी त्याला शोमधून बाहेर काढण्याचा निर्णय घेतला. आम्हाला एक शेवटचा शॉट एकत्र हवा होता. त्यानंतर आम्ही त्याला शोमधून बाहेर करणार होतो. पण आमच्या या प्लानविषयी आलोकनाथला समजले आणि तो त्या दिवशी सेटवर दारु पिऊन आला. शूटसाठी बोलवेपर्यंत तो सेटवर दारु पित होता. शूटिंग सुरु झाली आणि कॅमेरा रोल होताच तो नवनीतला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करु लागला. तेव्हा नवनीतने त्याच्या कानशिलात लगावली होती. आम्ही त्याला सेटवरुन लगेच हाकलून दिले होते." नवनीतने 'जान तेरे नाम', 'राजा हिंदुस्तानी', 'अजब प्रेम की गजब कहानी' आणि 'करीब करीब सिंगल' या बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे.  

बातम्या आणखी आहेत...