आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोट्यावधींच्या आलिशान घरात राहते 'बाहुबली'ची 'देवसेना', अनेक लग्जरी कारची आहे मालकिन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई: 'बाहुबली' चित्रपटात देवसेनाची भूमिका साकारलेली अभिनेत्री अनुष्का शेट्टी लवकरच डायरेक्टर गौतम मेननच्या 'ओन्द्रगा' चित्रपटात दिसेल. 7 नोव्हेंबर 1981 रोजी कर्नाटकातील मेंगलुरुमध्ये अनुष्काचा जन्म झाला. तिचे खरे नाव स्वीटी आहे. अनुष्का तिच्या स्वीटी या नावाप्रमाणेच स्वीट आहे. तिने आपल्या एका सीनियर ड्रायव्हरला 12 लाकांची ब्रांड न्यू कार गिफ्टी दिली होती. 

 

158 कोटींची मालकिन आहे अनुष्का 
नेटवर्थियर रिपोर्टनुसार, अनुष्का 22 मिलियन डॉलर (जवळपास 158 कोटी रुपये)च्या प्रॉपर्टीची मालकिन आहे. हैदराबादमधील पॉश परिसर जुबली हिल्स येथील वुड्स अपार्टमेंटच्या 6th फ्लोरवर तिचे आलिशान घर आहे. याची किंमत कोट्यावधी रुपये आहे. अनुष्का सध्या एका चित्रपटासाठी 4 ते 5 कोटी रुपये घेते. अनुष्काला लग्जरी कारचा शौक आहे, तिच्याजवळ अनेक ब्रांड्सच्या कार आहेत. सध्या तिच्या जवळ बीएमडब्ल्यू 6, ऑडी A6 आणि Q5 आणि टोयोटा कोरोला सारख्या लग्जरी CARS आहेत. 


अनुष्का अनेक मोठ्या ब्रांड्सच्या जाहिरात करते 

अनुष्का एमबीएस ज्वेलर्स, द चेन्नई सिल्क, इंटेक्स मोबाइल, कोलगेट अॅक्टिव्ह सॉल्ट, आणि डाबर आवला सारख्या ब्रांडच्या जाहिराती करत असते. ती इंटेक्स मोबाइलची ब्रांड अम्बेसडर राहिली आहे. 

 

चित्रपटांमध्ये येण्यापुर्वी ती योगा शिकवायची 
ग्लॅमरस दुनियेत येण्यापुर्वी अनुष्का लोकांना योगा शिकवायची. तिच्या कुटूंबातील कोणताही मेंबर फिल्मी बॅकग्राउंडमधून नाही. स्टारडमपुर्वी अनुष्का ही भरत ठाकुरच्या अंडरमध्ये योगा इंस्ट्रक्टरचे काम करत होती. त्याच काळात एका डायरेक्टरची तिच्यावर नजर गेली आणि त्यांनी अनुष्काला चित्रपटाची ऑफर दिली. 


अनुष्काने या चित्रपटांमध्ये केले आहे काम 
अनेक तामिळ आणि तेगुलु चित्रपटांमध्ये अनुष्काने काम केले आहे. 2005 मध्ये रिलीज झालेल्या 'सुपर' या तेलुगु चित्रपटांतून तिने डेब्यू केला होता. 34 वर्षीय अनुष्काने 'बाहुबली'सोबतच Vikramarkudu (2006), अरुंधति (2009), वेदम (2010), रुद्रमादेवी (2015) आणि सिंघम सारख्या हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. 

बातम्या आणखी आहेत...