आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • When Asked About Doing Show In Pakistan, Mika Said, "Why Don't You Ask Anything To Sonu Nigam ?"

पाकिस्तानमध्ये शो केल्याबद्दल विचारले गेले प्रश्न तर भडकला मीका, म्हणाला - 'सोनू निगमला काहीच का म्हणत नाही ?'

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : पाकिस्तानमध्ये इव्हेन्ट केल्यामुळे वादात अडकलेला गायक मीका सिंहने बुधवारी एका प्रेस कॉन्फरन्समध्ये स्पष्टीकरण दिले. तो म्हणाला की, पाकिस्तान जाणे आणि यादरम्यान अनुच्छेद 370 हटवले जाणे एक योगायोग होता. मीका म्हणाला जर, त्याने चूक केली आहे तर तो देशाला माफीदेखील मागत आहे. पण यादरम्यान जेव्हा मीडियाने त्याला आणखी काही प्रश्न विचारले तेव्हा तो भडकला आणि तो म्हणाला, 'काही महिन्यांपूर्वी सोनू निगमनेदेखील तिथे शो केला होता, त्याला काही का नाही विचारात ?'


तो पुढे म्हणाला, 'काही महिन्यांपूर्वी नेहा कक्कर, सोनू निगमने आतिफ असलम याच्यासोबत तिथे एक शो केला होता. तेव्हा तुम्ही त्यावेळी काही का बोलले नाही? मी एकटाच का पकडलो गेलो. यासाठी का की, तुम्ही मला विचाराल आणि ती बातमी बनून जाईल.

काही वेळेपूर्वीच मागितली होती माफी... 
या वादापूर्वी मीकाने इव्हेन्ट केल्याबद्दल स्पष्टीकरण दिले होते. मीकासोबत फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइजचे अध्यक्ष बीएन तिवारी आणि अशोक पंडितदेखील होते. फेडरेशन आणि देशाची माफी मागितल्यानंतर त्याच्यावरील प्रतिबंध फेडरेशनने हटवला आहे. मीकाने हेदेखीलम्हणाला होता की, क्लायेंटसोबतच्या जुन्या कमिटमेंटमुळेच तो कराचीला गेला होता. 

बातम्या आणखी आहेत...