आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अटलजींनी बिग बींची घेतली होती फिरकी, म्हणाले होते- 'तर मला त्यांच्यासोबत रेखांना निवडणुकीत उभे करावे लागले असते'

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : हा किस्सा 1987 चा आहे. बोफोर्स कांडमध्ये अमिताभ बच्चन यांचे नाव जोडले गेले होते. नाव जोडले गेल्यानंतर अमिताभ यांनी खासदारकीचा राजीनामा दिला होता. या मुद्द्यावर अटल बिहारी वाजपेयी यांनी एका मुलाखतीत अमिताभ यांची फिरकी घेतली होती. पत्रकाराने अटल बिहारी वाजपेयींना विचारले होते की, अमिताभ बच्चनने खासदारकीचा राजीनामा दिला आहे. तुम्हाला वाटते का की, बोफोर्स कांडमध्ये त्यांचाही हात आहे. उत्तर देताना वाजपेयी म्हणाले होते की, अमिताभ यांनी पंतप्रधान राजीव गांधींचा बचाव करण्यासाठी राजीनामा दिला. त्यांनी राजकारणात यायला नको होते. 

 

मुलाखतीत अटल म्हणाले होते की, अमिताभ बच्चनचे भाऊ अजिताभ आपला व्यवसाय सोडून अचानक स्विटजरलँडमध्ये का गेले. त्यांची मुलं महागड्या शाळेत शिक्षण घेत आहेत, त्यांची फीस कुढून दिली जातेय. 


1984 मध्ये लोकसभा निवडणुकीत इलाहाबाद येथे खासदारकीच्या पदावर अमिताभ बच्चन यांनी उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री हेमवंती नंदन बहुगुणा यांचा पराभव केला होता. वाजपेयी यांनी या मुलाखतीत खुलासा केला होता की, जर ते निवडणुकीत दिल्लीमधून उभे राहिले असते, तर मी त्यांच्या प्रसिध्दीशी स्पर्धा करु शकलो नसतो. यामुळे मी स्वतः उभे न राहता बिग बी विरुध्द रेखा यांना निवडणुकीत उभे केले असते. 
 

बातम्या आणखी आहेत...